आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहनधारक घेत आहेत नियमांचा गैरफायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील वाढते अपघात लक्षात घेऊन अवजड वाहनांना सकाळी सात ते सायंकाळी सात (दुपारी दीड ते साडेतीन मुभा आहे) या कालावधीत बंदी आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल, पाणी, गॅस, अन्नधान्य वाहतूक, शासकीय कामासाठी बांधकाम साहित्य (वाळू, सिमेंट, खडी) यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. पण, या नियमाचा गैरफायदा घेऊन आणि पोलिसांना हाताशी पकडून काही ट्रकचालक वाळू वाहतूक व अन्य अवजड वाहने शहरात आणतात. यावर सक्षमपणे कारवाई करण्याची मागणी आहे.

मार्केट यार्डजवळ अवजड वाहने ये-जा करतात. पोलिस कारवाईत सातत्य नाही आणि काही पोलिस दुर्लक्ष करतात. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असते. भरधाव ट्रक सकाळी, संध्याकाळी धावत असतात. अपघातात आणखी कुणाचा बळी गेल्यानंतर कार्यवाही करणार का असा प्रश्न आहे. दरम्यान, होटगी रस्ता, विजापूर रस्ता या मार्गांवर आठ वाळू ट्रकवर कारवाई करून प्रत्येकी 600 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी दिली. डीमार्ट ते सिंधू विहार कॉलनी या मार्गाकडे जाताना चार वाळू ट्रक सोमवारी सकाळी अकराच्या सुमाराला पोलिसांनी पकडले आहेत.