आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलबर्गा रेल्वे विभाग झाल्यास सोलापूरला बसेल मोठा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कर्नाटकचे मल्लीकार्जुन खरगे यांना रेल्वे मंत्रिपद मिळाल्यापासून गुलबर्गा येथे स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची चर्चा आहे. रेल्वे प्रशासनात हीच चर्चा आहे. गुलबर्गा येथे स्वतंत्र रेल्वे विभाग झाल्यास सोलापूर विभागाचे उत्पन्न सुमारे एक हजार कोटींनी घटेल. परिणामी सोलापूर विभागाचे महत्त्व कमी होऊन सुविधांवर परिणाम होईल, अशी शक्यता सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात बंगळूरू येथे र्शी. खरगे यांनी या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतल्याचे वृत्त आहे. सोलापूर विभागातील वाडी येथून सर्वाधिक मालवाहतूक होते. गुलबर्गा विभाग झाल्यास वाडीसह अन्य स्थानके तेथे जोडली जातील. सोलापूर रेल्वे विभागाला वाडी स्थानकातील मालवाहतुकीतून एकूण उत्पन्नापैकी 70 टक्के वाटा मिळतो. तसेच, वाडीजवळ चार ते पाच सिमेंट कारखाने होणार आहेत.

गुलबर्गा विभाग स्थानक निर्मितीसाठी रेल्वे मंत्रालयाला सुमारे 200 कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच नवे डीआरएम कार्यालयासाठी जागा व मूलभूत सुविधांकरिता मोठी गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय 150 ते 200 नवीन अधिकार्‍यांची नेमणूक करावी लागेल.

निधीवर होईल परिणाम
गुलबर्गा विभाग झाल्यास सोलापूर विभागाचे उत्पन्न कमी होईल. तसेच रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी मंजूर होणार्‍या निधीवर परिणामाची शक्यता आहे. सुशील गायकवाड, वरिष्ठ परिचलन अधि.