आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी महिला व बाल कल्याण आयुक्तालयाने संरक्षण अधिकारी हे पद निर्माण केले आहे. वर्ग 1 व वर्ग 2 स्तरावर काम करणारे शासकीय अधिकारी ही मदत करणार आहेत. प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात कौटुंबिक समस्येबाबत महिलांना मदत करून त्यांच्यावर होणार्या अत्याचारावर अंकुश लावण्याची भूमिका या संरक्षण अधिकार्यांना पार पाडावी लागेल.
नवर्याचा शारीरिक त्रास, सासरच्यांकडून होणारा छळ तसेच कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीकडून महिलेला होणारा त्रास हे संरक्षण अधिकारी रोखतील. प्रत्येक गावात अंगणवाडीच्या कार्यालयातच त्यांचे कार्यालय थाटले जाईल. महिला अर्ज करून आपली तक्रार नोंदवू शकतील. सोलापूर शहर आणि जिल्हा स्तरावर 20 अधिकारी व त्यांना मदत करणार्या 20 मुख्य सेविकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
कार्यालय अंगणवाडीत
तालुका स्तरावर व शहरात अंगणवाडीच्या कार्यालयात संरक्षण अधिकारी कार्यरत असतील. महिला अंगणवाडीच्या कार्यालयात तक्रार नोंदवू शकतात.
आयुक्तालय देणार प्रशिक्षण
महिला व बाल कल्याण आयुक्तालयाच्या वतीने या संरक्षण अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला संरक्षणाच्या तरतुदी, महिला यामार्फत कसा न्याय मागू शकतील, अर्ज कसा करावा, संरक्षण अधिकार्यांनी घटना अहवाल कसा तयार करायचा, याचेही प्रशिक्षण देण्यात येईल.
आज प्रशिक्षणाचा श्रीगणेशा
सोलापूर जिल्हा व शहरातून 20 अधिकारी व 20 मुख्य सेविकांना आज जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहात सकाळी 11 ते 5 पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी महिला आयुक्तालयाचे एन. डी. डहाळे व अँड. मीना जाधव (उस्मानाबाद) अँड. रत्नमाला चौधरी (उस्मानाबाद), अँड.अरविंद अंदोरे (सोलापूर) यांचे व्याख्यान होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.