आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंग दिनानिमित्त शहरातून निघाली रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सहानुभूती नको, संधी द्या, आम्हाला मुख्य प्रवाहात सामावून घ्या, अशा घोषणा देत विशेष (अपंग) मुलांनी शहरातून रॅली काढली. यात अपंग, अंध, मूक-बधिर, मतिमंद आदी 54 शाळांतील 800 विद्यार्थी सहभागी होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हा व सर न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी केले. चार हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सिद्धेश्वर मंदिर, जिल्हा परिषद मार्गे रंगभवन येथे रॅली विसजिर्त झाली.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, नगरसेवक देवेंद्र भंडारे, रोहिणी तडवळकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, एल. एल. मारऊकर यांची उपस्थिती होती.