आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीच्या सीमा ओलांडून बांधल्या रेशीमगाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जातीच्या सीमा ओलांडून 16 अंध, अपंग आणि कर्णबधिर जोडप्यांनी गुरुवारी सायंकाळी रेशीमगाठी बांधल्या. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) जिल्हा शाखेच्या वतीने हेरिटेज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वडील मंडळी उपस्थित होती.

लाल रंगाच्या साडीतील वधू आणि पांढर्‍या पोशाखातील वरांचे हेरिटेजमध्ये आगमन झाले. जोडीदार दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा या बाबी येथे दूर होत्या. परंतु त्यांचे मन मात्र मनापासून जुळले होते. त्यामुळेच ही मंडळी एकमेकांशी मनापासून बोलत होती. एकमेकांचा आधार घेऊनच चालत होती. भावी आयुष्यातील स्वप्ने रंगवत होती. नॅब संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

महापौर अलका राठोड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष धर्मा भोसले, नगरसेवक देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, आशा म्हेत्रे, मनोज यलगुलवार, अंकुश कदम, पांडुरंग चौधरी, के. डी. पाटील, शशीभूषण यलगुलवार, डॉ. चंद्रकांत कुलकर्णी, धरमचंद निमाणी, माणिकसिंग मैनावाले, डॉ. विनोद जनई, प्रकाशचंद वेद, मोहन आंग्रे आदी या वेळी उपस्थित होते.