आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो, पुरुषोत्तम पास झाला, आत्मविश्वास जागला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील एका नामांकित शाळेत पुरुषोत्तम शिकत होता. जन्मापासूनच अपंगत्व असल्याने त्याच्या अभ्यासाची गती संथ आहे. अशी तशी त्याने दहावी गाठली. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याने अभ्यास केला. परंतु तो नापास झाला. तो पास व्हावा, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती. आणखी एकदा प्रयत्न करण्यासाठी त्याला वा. ऊ. तडवळकर ट्रस्टच्या ओंकार वर्गात प्रवेश घेण्यात आला. त्याने मनापासून अभ्यास केला. सोमवारी निकाल लागल्यानंतर त्याची बहीण राधिका हिला आश्चर्याचा धक्काच बसला. ‘अहो, पुरुषोत्तम पास झालाय...’ असे सांगत तिने पेढे वाटले.
तडवळकर ट्रस्टच्या वतीने मुरारजी पेठेत नापासांची शाळा चालवण्यात येते. जी मुले कष्टातून शिकतात, ज्यांची आर्थिक स्थिती सक्षम नाही, ज्यांना शारीरिक व्याधी आहेत, अशी मुले या शाळेत येतात. त्यापैकीच पुरुषोत्तम गौड हा मुलगा गेल्या वर्षी या शाळेत दाखल झाला. शाळेच्या प्रमुख शीला पतकी यांनी त्याला प्रवेश दिला. तो पास होईल. त्याला वर्गातील इतर मुले स्वीकारतील का? हा प्रश्न होता.
नापासांच्या शाळेत रमला
पुरुषोत्तम शरीराने वाढला तरी त्याची सारी लक्षणे एखाद्या लहान मुलासारखी होती. असा हा पुरुषोत्तम नापासांच्या शाळेत आला. इतर मुलांनी त्याला हसत-खेळत स्वीकारले. शिक्षकांनीही कष्ट घेतले. दहावीची परीक्षा आली, त्याला २० मिनिटे जादा मिळाली. त्याचा फायदा घेत त्याने पेपर सोडवले. सोमवारी निकाल लागला. लगेच पुरुषोत्तमच्या आई-वडिलांनी पतकी यांना फोन नापासाच्या शाळेतील शिक्षकांनी कष्ट घेतल्याने पुरुषोत्तमला आत्मविश्वास मिळाला अन् तो उत्तीर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.