आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फ्लिपकार्ट’, ‘अमेझॉन’वर हातमाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वस्त्रोद्योग विभागाने हातमाग उत्पादनांच्या विक्रीसाठी फ्लिपकार्ट, अमेझाॅन अशा ऑनलाइन शापिंग (व्यावसायिक) वेबसाइटचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.मंत्रालयात हातमागाविषयी बुधवारी बैठक झाली. तीत ते बोलत होते. या वेळी वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव कुरसंगे, वस्त्रोद्योग संचालनालयातील सहाय्यक संचालक विनोद दंडारे, नगरसेवक शिवानंद पाटील, महात्मा हातमाग विणकर संघाचे प्रतिनिधी नागेश पासकंटी, राजू काकी, श्रीनिवास बंडा, तुळशीराम पोतू, पांडुरंग काकी, सुरेश मादगुंडी, व्यंकटेश मादगुंडी, इरेश रोड्डा आदी उपस्थित होते.
वस्त्रोद्योग विभागाने विणकरांचे मेळावे, कार्यशाळा, परिषदा घेऊन योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना देशमुख यांनी दिली. विणकरांना ओळखपत्रे देण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी. केंद्राच्या क्रेडिट कार्ड योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिकांसह नाविन्यपूर्ण योजना आखण्यात येतील, असेही देशमुख यांनी सांगितले.


घरदुरुस्तीसाठी ४५ हजारांची मदत
विणकरांनाघराच्या दुरुस्तीसाठी ३५ ते ४५ हजार रुपये मदतीची केंद्र शासनाची योजना आहे. पण माहितीअभावी अनेक विणकरांना याचा लाभ मिळत नाही. या योजनेविषयी विणकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रसिद्धी करण्यात यावी, असे निर्देश श्री. देशमुख यांनी वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
बातम्या आणखी आहेत...