आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची प्रकृती उपोषणाने खालावली, रुग्णालयात दाखल होण्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- किमान वेतनच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे १३ पैकी तीन कामगारांची प्रकृती खालावली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शनिवारी त्यांची तपासणी करून उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. त्याला कामगारांनी नकार दिला. निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, पालकमंत्री तथा कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख उपोषणस्थळी येऊन शब्द दिल्यानंतर कुठलीच चर्चा झाली नाही.
यंत्रमाग कामगारांना आठ तासांसाठी ११ हजार १७३ रुपये किमान वेतन देण्याची अधिसूचना राज्य शासनाने २९ जानेवारी २०१५ रोजी काढली. परंतु यंत्रमागधारकांनी ती अमान्य केली. ती मिळवण्यासाठी कामगारांनी शासन स्तरावर निवेदने दिली. मेपासून धरणे, निदर्शने केली. मोर्चा काढला. परंतु दखल घेतली जात नसल्याने मेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ कामगारांनी यात सहभाग घेतला. उर्वरित कामगार त्यांना पाठिंबा देण्यासाठी चक्री उपोषण सुरू केले. या १३ कामगारांपैकी एकनाथ महेश्वरम आणि अंबादास म्हंता अशा दोघांची प्रकृती खालावली.
प्रस्थापित कामगार नेत्यांना कामगारांनी दिला धक्का
यंत्रमागकामगारांसाठी वर्षानुवर्षे लढणारे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन, विडी यंत्रमाग कामगार सेना अशा संघटनांच्या प्रमुखांना बाजूला ठेवून या लढ्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली कामगार एकवटले. श्रीधर गुडेली आणि सोमशेखर पासकंटी या कामगारांनी त्यांचे नेतृत्व केले आणि त्याला कामगारांचे बळ िमळाले. मेपासून सुरू झालेले आंदोलन अखंड सुरू आहे. दुसरीकडे कामगारांविना यंत्रमागांवरचे उत्पादन ठप्प झाले आहे. कारखानदार मंडळींनी शासनाच्या अधिसूचनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.
बैठक झाली नाही
पालक मंत्री देशमुख शुक्रवारी उपोषणस्थळी भेट देत किमान वेतनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी त्यांच्या बैठकीचा निरोप आला नाही. कामगारांची प्रकृती बिघडत आहे. त्यांचे काही बरे-वाईट झाले तर त्याला शासनच जबाबदार असेल.”
- श्रीधरगुडेली, कार्याध्यक्ष,मनसे कामगार संघटना

मनसे यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी बेमुदत उ‌पोषण सुरू केले. त्याला कामगारांचा मोठा प्रतिसाद आहे.
बातम्या आणखी आहेत...