आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hashmiya Teachers Collage Result Declare Solapur

‘हाशमिया’ विद्यार्थिनींच्या हाती अखेर गुणपत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रामवाडी येथील हाशमिया उर्दू अध्यापिका महाविद्यालयातील डीएड प्रथमवर्षीय विद्यार्थिनींचा निकाल मंगळवारी दुपारी घोषित करून संस्थेचे अध्यक्ष लियाकतअली विजापुरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गुणपत्रिका देण्यात आले. महाविद्यालयाचा निकाल 81.32 टक्के लागला.

उर्दू डीएडच्या प्रथमवर्षीय विद्यार्थ्यांचा निकाल 20 ऑगस्ट रोजी ऑनलाइन जाहीर झाला. परंतु हाशमियाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला नाही. संस्थेच्या काही चुकांमुळे हा निकाल राखीव ठेवण्यात आला. तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी संस्थेला तब्बल अडीच महिने लागले. संघर्ष करीत अखेर संस्थेने निकाल मिळविला. मंगळवारी दुपारी हा निकाल महाविद्यालयात घोषित करण्यात आला.

रुकिया अचकल या विद्यार्थिनीने 77.50 टक्के मिळवित प्रथम येण्याचा मान मिळविला. तर आस्मा नदाफ आणि हिनाकौसर शेख या दोन्ही विद्यार्थिनींनी 75.50 टक्के गुण मिळूवन द्वितीय क्रमांक पटकावला. पास झालेल्या विद्यार्थिंनी श्री. विजापुरे यांच्या हस्ते गुणपत्रिका देण्यात आल्या. यावेळी सचिव दस्तगीर जमादार, उपाध्यक्ष निसार काझी, रफिक विजापुरे, बाबूभाई शेख, प्राचार्य मोहीन सय्यद, बलदार आदी उपस्थित होते.