आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानला जाण्यासाठी त्याने चोरली सिटीबस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-तो बेरोजगार होता. आई-वडिलांनी त्याला घरातून हाकलले होते. पाच-सहा दिवसांपूर्वी तो सोलापुरात आला व बिगारी काम केले. पैसे त्याच्याकडे नव्हते. त्याला राजस्थानला जायचे होते. सात रस्ता परिसरातील सिटीबस डेपोसमोर तो थांबला. तेवढय़ात सिटीबस थांबवून चालक आत गेला. त्याच्या मनात युक्ती आली की सिटीबस घेऊन जायचे. महामार्गावरून राजस्थानला जाणारा ट्रक पकडायचा. त्याअगोदरच पोलिसांनी त्याचे मनसुबे उधळून लावले. देवेंद्रसिंग दौलत चौहान (वय 25, रा. पिंपलीया, किडमल, करोडा, भिलवाडा, राजस्थान) या संशयितला 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी त्याला अटक झाली होती. चौहान हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. पण तपासात निष्पन्न झाले नाही. फौजदार गोविंद कदम यांनी चौहानच्या आई-वडिलांना आज दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो झाला नाही. त्याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली आहे. सिटीबसमधील डिझेल संपेपर्यंत तो बस महामार्गावरून घेऊन जाणार होता. तिथून ट्रकमधून तो राजस्थानला जाणार होता. त्यापूर्वी त्याला रंगभवन चौकात अटक करण्यात आली. गुरुवारी आणखी त्याची चौकशी करणार असल्याची मािहती फौजदार कदम यांनी दिली.

साहाय्यक निरीक्षक मुजावर यांचा सत्कार

महापलिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी साहाय्यक पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांचा बुधवारी सत्कार केला. मुजावर यांनी संशयावरून बस थांबवून चौकशी केली. संशय आल्यामुळे चौकशी करताना चोरीचा प्रकार समोर आला होता. मुजावर यांच्यासह सांगळे, मुस्ताक मुजावर, गोविंद राठोड, बाळासाहेब कोबरणे, मदन गायकवाड, अस्लम सय्यद या पोलिस पथकाचा महापालिकेत गौरव करण्यात आला आला. परिवहन समितीचे मोहन चव्हाण, अनिल कंदलगी, महेश चव्हाण आदी सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.