आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटविकार टाळण्यासाठी संतुलित आहार आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोटाचे विकार टाळण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन नामवंत सर्जन डॉ. अरुण मनगोळी यांनी केले. विजापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भावसार व्हीजन इंडिया सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य जागृती सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात डॉ. मनगोळी मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर शिवाजी उपरे, गिरीश वायचळ, गिरीश पुकाळे, मनोज बीडकर उपस्थित होते.
डॉ. मनगोळी म्हणाले, "छातीत जळजळणे, मळमळणे ही लक्षणे पित्ताची आहेत. जंकफूड, धूम्रपान, औषधांचे अतिसेवन, अनियमित जेवण, तळलेले पदार्थ टाळल्यास पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.'
वसंत पतंगे, किरण मुसळे, हर्षद क्षीरसागर, अॅड. दीपक मैंदरकर उपस्थित होते. आयटीआयचे मनोज बीडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.