आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्‍यः लोहयुक्त गोळ्या की लोखंडाचे चणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोहयुक्त गोळय़ा दिल्यामुळे माळकवठे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना उलटी, जुलाबांचा त्रास झाल्याची घटना घडली. केंद्र शासनाच्या माध्यमातून येणार्‍या विकली आयर्न फॉलिक सल्फीमेंटेशन (डब्ल्यू.आय.एफ.एस) ही योजना राज्यात राबवण्यात येत आहे. मात्र, बिहार येथे घडलेल्या पार्श्वभूमीवर व राज्यात वर्धा येथील घडलेल्या दोन घटनेनंतर लोहयुक्त गोळय़ा विद्यार्थ्यांना देणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकार झाला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

68 लाख गोळय़ा अहवालाच्या प्रतीक्षेत
जिल्हय़ात एकूण साडेतीन लाख लाभार्थी आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकूण 68 लाख गोळय़ा सोलापूर जिल्हा परिषदेच्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, माळकवठे येथील घडलेल्या घटनेमुळे गाळय़ा बंद करण्यात आल्या आहेत.


काय असते गोळय़ांत
विद्यार्थ्यांमध्ये एचबीचे प्रमाण वाढावे म्हणून या गोळय़ा विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. या गोळय़ांमध्ये फेरस सल्फेट असते. लोह आणि मीठ यांचे मिर्शण करून ही गोळी तयार करण्यात येते. त्यामुळे मुलांचे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.


पित्ताचे प्रमाण वाढते
मुलांना पित्ताचा त्रास पूर्वीपासून असेल तर त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे उलट्या, जुलाब होतात. त्यामुळे या गोळय़ा मुलांना कितपत उपयोगी ठरतील, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. त्यासाठी मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.