आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेशनकार्डअभावी रखडली मुलीची हृदय शस्त्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- हृदयाला छिद्र असलेल्या प्रगती संजय प्रेमगल (तिसरी) या आठ वर्षीय चिमुरडीवर केवळ शिधापत्रिका नसल्यामुळे शस्त्रक्रियेस विलंब होत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊ शकते. मात्र त्यासाठी शिधापत्रिकेची अट आहे. ती हरवल्याने दुबार शिधापत्रिकेसाठी अर्ज करूनही पंढरपूर तहसील कार्यालयाकडून दीड वर्षांपासून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत प्रेमगल कुटुंबीयाकडून व्यक्त केली जात आहे.
लालफितीची दफ्तर दिरंगाई चिमुरडीच्या जीवावर बेतण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधितांनी त्वरित शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उंबरगाव ग्रामस्थ आणि तिच्या शाळेतील शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींकडून केली जात आहे. संजय यांचे गावात छोटे किराणा दुकान आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, प्रगती एक मुलगा असा परिवार आहे. प्रगतीची आई घरकाम करते.

दारिद्र्य रेषेखालील मूळ पिवळी शिधापत्रिका हरवल्याने दुबार शिधापत्रिकेसाठी सर्व कागदपत्रांसह १९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंढरपूर तहसील कार्यालयात प्रगतीचे वडील संजय प्रेमगल यांनी अर्ज केला आहे. तेव्हापासून हेलपाटे मारून अद्यापही शिधापत्रिका मिळाल्याने मुलीची शस्त्रक्रिया लांबत चालली आहे.
- सध्या राज्यभरातील तहसीलदार संघटनेने पुरवठा विभागाचे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तीन आठवड्यांपूर्वी अर्ज दाखल केला असेल मात्र त्यांना अद्याप शिधापत्रिका का मिळाली नाही हे आपणाला कागदोपत्री सविस्तर माहिती घेऊन सांगता येईल.”
गजानन गुरव, तहसीलदार
- शिधापत्रिका हरवली आहे. परिस्थितीअभावी मला एवढा मोठा खर्च झेपत नाही. राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून शस्त्रक्रिया करता येईल, असे मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. शिधापत्रिकेसाठी अर्ज दिला आहे. अद्यापही हेलपाटे चालू आहेत. नुसती उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.”
संजय प्रेमगल, मुलीचे वडील