आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या जीवनशैलीचा सर्वाधिक ताण हृदयावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आजच्या घडीला भारतात हृदयविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे धावपळ, दगदग, बदलती आहारशैली आणि कामातील ताणतणाव वाढले आहेत. या बदलत्या जीवनशैलीचा सर्वाधिक ताण हृदयावर पडत आहे. सोलापुरातील सुमारे ३० टक्के लोकांना हृदयविकाराने ग्रासले आहे. हे प्रमाण पुढील काळात आणखी वाढणार असल्याचे मत हृदयरोग तज्ज्ञ एस. एस. तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.
वृद्धांनाच हृदयविकाराचा झटका येतो हा समज पूर्वीच्या काळी होता. बदलत्या जीवनशैलीने तो समज चुकीचा ठरवला. पस्तीशीतील तरुणाई हृदयविकाराच्या विळख्यात आहे. नुसती तरुणाईच नाही तर लहान मुलांच्या हृदयाच्या झडपा बदलाव्या लागतात. शेकडो बालकांना हृदयविकार असल्याचे दरवर्षी करण्यात येणाऱ्या शालेय आरोग्य तपासणीतून पुढे येते.
बदललेल्या जीवनशैलीचा सर्वाधिक ताण हृदयावर पडतो. हा ताण पेलवणे एक आव्हान ठरत आहे. स्पर्धेच्या युगात मुलांसाठी धावताना आई-वडिलांची दमछाक होते. मुलांच्या प्रगतीचा ताण आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसतो. तो पुढे हृदयावरही येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण न घेता कूल जीवन जागा, असा संदेशही त्यांनी दिला.
दरमहा 700 अ‍ॅन्जीओग्राफी
क्ष्सोलापुरात दरमहा 700 अ‍ॅन्जीओग्राफी तर 100 अ‍ॅन्जीओप्लास्टी होतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवल्यास धोका टाळता येऊ शकतो. त्यासाठी पहाटे उठा, तीस मिनिटे चाला. हृदयविकाराचा धोका टाळा.'' डॉ. एस. एस. तोष्णीवाल, हृदयरोगतज्ज्ञ
हृदयविकार टाळण्यासाठी हे करा
-रोज ३० मिनिटे हलका व्यायाम
-वजनावर नियंत्रण
-धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान न करणे
- तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
- डॉक्टरांकडे नियमित तपासणी