आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटवरची धूळ पुसा आता! चालकासह मागे बसणाऱ्यांना बंधनकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. या कायद्याचा अंमल येत्या जुलैपासून सक्तीने करण्याचा मनोदय पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे अडगळीत पडलेले हेल्मेट बाहेर निघतील तर दुसरीकडे नव्या हेल्मेटची मागणी वाढणार आहे.
दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा सक्ती झाल्यानंतर अनेकांनी हेल्मेट खरेदी केले होते. महिनाभरातच सक्तीची कारवाई आटोपली. त्यामुळे हेल्मेट अडगळीत गेले. ते आता बाहेर येतील. तसेच अलीकडच्या काळात दुचाकी विकत घेतलेल्यांनी सक्ती नसल्याने हेल्मेट विकत घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नव्या हेल्मेटसाठी मागणी वाढणार आहे.

चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्यांना हेल्मट वापरणे सक्तीचे आहे. शहरात दुचाकींची संख्या लाख ४७ हजार ३१६ आहे. ही संख्या पाहता नव्या हेल्मेटसाठी मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याच्या तुलनेत शहरातील दुकानात उपलब्ध हेल्मेट संख्या अतिशय जुजबी आहे.मोटार वाहन कायदा १२९ ‘अ’ प्रमाणे चालकासह मागे बसणाऱ्यास हेल्मेट सक्ती आहे. ते नसल्यास १०० रुपये दंड होतो. पुणे, मुंबई, पणजी येथे अंमल सुरू आहे.

हेल्मेटचा फायदा
डोक्यालागंभीर इजा मृत्यूचे कारण ठरते. हेल्मेट वापरल्यास डोक्याला इजा होण्याचे प्रमाण ७० टक्के कमी होते. तर मृत्यूचे प्रमाण ४२ टक्के कमी होते. त्यामुळे अपघातात जीवनरक्षक म्हणून हेल्मेटचे खूप महत्त्व आहे.

विविध आकार-प्रकार
हेल्मेटविविध आकार आणि प्रकारात उपलब्ध आहेत. प्रामुख्याने फूल आणि हाफ असे दोन प्रकार आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे आकाराचे हेल्मेट बाजारात आणले आहेत. महिलांसाठी विविध आकर्षक रंगात हाफ हेल्मेट असतात.

हेल्मेट सक्ती का?
वाहनअपघातासंदर्भातील सर्वेक्षणात अन्य वाहनांच्या तुलनेत दुचाकीस्वारांना जास्त धोका असल्याची माहिती पुढे आली आहे. कारच्या तुलनेत दुचाकीस्वारांना गंभीर इजा ही पाचपट अधिक होते. १९८० नंतर देशात दुचाकी अपघाताचे प्रमाण पाचशेपेक्षा जास्त पटीने वाढले आहे.

कायद्याचा मान राखावा
वाहनचालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक असेल तर कायद्याचा मान निश्चित राखला जावा. मुख्यत: युवक-युवतींनी नेहमी हेल्मेटचा वापर करावा.” पूजाहोसमनी, नागरिक, सोलापूर

... तर आणखी मागवू
साधेब्रँडेड दोन्ही प्रकारचे हेल्मेट उपलब्ध असून ३५० रुपयांपासून ते हजार पर्यंत त्याचा दर आहे. सध्या आमच्याकडे १५ हेल्मेट उपलब्ध आहेत. गरज असल्यास आणखी मागवू.” अहिश नाईक, दुचाकी साहित्य, हेल्मेट विक्रेता

महिन्याला १०० विक्री
सोलापुरात हेल्मेटची विक्री करणारे विक्रेते कमी आहेत. दुचाकी विक्रेत्यांकडे ब्रँडेड हेल्मेट आहेत. दर महिन्याला सुमारे १०० हेल्मेटची विक्री होते. सध्या १० हेल्मेट उपलब्ध आहे.” चेतनचव्हाण, दुचाकी साहित्य, हेल्मेट विक्रेता

असा आला कायदा
सिम्बाॅयसीसकायदा महाविद्यालयाच्या आठ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जुलै २००३ मध्ये उच्च न्यायालयाने हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती सी. के. ठक्कर आणि न्यायमूर्ती विजया तहिलरमानी यांनी आदेश दिला. कायद्याची चौकट निश्चित करण्यासाठी मुदतही दिली होती. त्याप्रमाणे राज्य सरकारने २१ जानेवारी २००५ला हेल्मेट सक्तीचे परिपत्रक जारी केले.

४०० ते २००० हजार
साधारण८५० रुपयांना ब्रँडेड हेल्मेट मिळते. आयएसआय मार्क असलेले घेण्याचा आग्रह आहे. मजबूत बांधणी, फायबर ग्लासची गुणवत्ता यावर किंमत असते. कमी किमतीचे हेल्मेट कमी दर्जाचे असू शकते. अपघातात जास्त नुकसान टाळता येणार नाही. दर्जा चांगला असल्यास नुकसान कमी होईल.
बातम्या आणखी आहेत...