आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसमोरच धावताहेत शहरातून अवजड वाहने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अपघात लक्षात घेता मागील आठ महिन्यांपासून सोलापुरात सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत शहरातील रस्त्यांवरून जड वाहनांना बंदी आहे. फक्त दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत त्यात शिथीलता आहे. पण, हा नियम डावलून जड वाहने दिवसभर ये-जा करताना दिसतात.

सकाळी सातनंतरही वाळू, खडी, सिमेंट नेणारी वाहने धावताता दिसतात. पण सरकारी वाहनांना मुभा आहे. मात्र, वाहतूक शाखेची परवानगी घेतलेले स्टिकर लावणे बंधनकारक आहे. तसे काहीही दिसत नाही. पुणे, हैदराबाद, विजापूर या मार्गावरून वाहने ये-जा करतात. तेही त्या ठिकाणी नेमलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसमोरच.

शाळा, कॉलेज सुरू होणार
सध्या उन्हाळा सुटीमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थ्यांची वाहतूक होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनेने सर्वांनाच हेलावून टाकले होते. आता 17 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. अपघाताचे धोके आहेत.


पर्यायी व्यवस्था करा
जड वाहनांना बंदी असताना ती शहरात कशी काय येतात. पोलिसांनी यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलावा. याशिवाय वाहनांना पर्यायी व्यवस्था हवी. उड्डाण पूल पाहिजेत.’’ गंगाधर घोंगडे, पालक

बायपास रस्ता करा
जड वाहनांसाठी बायपास रस्ता पाहिजे. तरच अपघात कमी होतील. शहरात वेगर्मयादा तीस कि.मी. प्रती तास गतीने हवी.’’ उदय नानजकर, पालक


कारवाई मोहीम तीव्र करू
बंदीचा काळात अवजड वाहने आम्ही शहरात येऊ देत नाही. तरीही काही वाहने आल्यास दंडात्मक कारवाई करतोच. सोमवारपासून पुन्हा खास मोहीम घेऊन अवजड वाहने शहरात आल्यास कारवाई करू. आसरा, महावीर चौकातील सिग्नल दिवे बिघडले आहेत. दुरुस्तीसाठी महापलिकेला सांगण्यात आले आहे. दोन दिवसांत दुरुस्त होतील.’’ खुशालचंद बाहेती, साहाय्यक पोलिस आयुक्त