आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- शहरात घरफोड्यांचे, चोर्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाही. वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे वारंवार होणार्या चोर्यांमधून दिसून येत आहे. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी गृह सोसायट्यांनी पाऊल उचलले आहे. शहरातील गुरुनानक नगर आणि महेश कॉलनी यांनी सीसीटीव्ही(क्लोज सर्किट)यंत्रणा उभारली आहे.परिसरात नजर ठेवण्यासाठी हायटेक यंत्रणेची मदत घेतली जात आहे.
गुरुनानक चौकातील सिंधी समाजाच्या गुरुनानकनगर सोसायटीने परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही (क्लोज सर्किट) 12 कॅमेरे लावले आहेत. यामुळे सोसायटीवर आणि परिसरावर 24 तास लक्ष ठेवता येणार आहे.
गुरुनानकनगर ही शंभर घरांची सोसायटी आहे. तेथे मोठा व्यापारी वर्ग राहतोय. यापूर्वी मंगळसूत्र हिसकावणे, दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक, छेडछाड करणे, व्यापार्यांवर हल्ले करणे, हुल्लडबाजी करत धूम स्टाइलने दुचाकी हाकणारे तरुण आदी प्रकार होत. यावर नियंत्रण आणि उपाय म्हणून सोसायटी अध्यक्ष जेठानंद बहिरवाणी, व्यापारी मोहन सचदेव, माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी व अन्य सदस्यांच्या संकल्पनेतून सीसीटीव्हीचा प्रस्ताव समोर आला आणि दोन महिन्यांपासून तो प्रत्यक्षात आला झाला. यामुळे अनेक घटनांवर नियंत्रण आल्याचे अध्यक्ष बहिरवाणी सांगतात. शहरातील इतर सोसायट्यांनीही आदर्श घ्यावा.
झुलेलाल गुरू ‘यंग ब्रिगेड’
सोसायटीत रात्रगस्त घालण्यासाठी जय झुलेलाल गुरू ‘यंग ब्रिगेड’ तरुणांची टीम तयार करण्यात आली असून यात 50 तरुणांचा सहभाग आहे. रात्री नऊ ते पहाटे दोन-तीनपर्यंत हे तरुण गस्त घाततात. सोबत सहा सुरक्षारक्षक आहेत. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करतात. पोलिसांच्या ईगल ब्रिगेड धर्तीवर ही यंग ब्रिगेड आहे.
या आहेत मागण्या
0तीन प्रवेशद्वारावर गेट बसवण्यासाठी महापालिकेने परवानगी द्यावी
0सोसायटीत सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत पोलिसांचे पेट्रोलिंग हवे
0पहाटेच्या सुमाराला पोलिसांची गस्त हवी
0किरपालदास खानचंदानी यांच्या घरात तीन वर्षांपूर्वी पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे दागिने चोरीला गेले, त्याचा तपास व्हावा.
तीन प्रवेशद्वार, बारा सीसीटीव्ही
सोसायटीत तीन प्रवेशद्वार आहेत. यासह अंतर्गत रस्त्यावर बारा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गुरुनानक मंगल कार्यालयात याचे मुख्य मॉनेटरिंग आहे. त्याच्या पाहणीसाठी कर्मचारी नेमलेत. पंधरा दिवसांचे रेकार्डिंग होते. सोसायटी मेन्टेन्समधून दोन-तीन लाख रुपये जमवून ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. याला खूप खर्च येत नाही.
-मोहन सचदेव, व्यापारी
यंग ब्रिगेडचे तरुण
हरिष नानकानी, गिरीश पमनानी, कुमार चंचलानी, मनोज व नागेश खानचंदानी,रोहित नागदेव, रोशन मुर्जानी, योगेश मुर्जानी, सोनू हसानी, नरेश पमनानी, जितू पमनानी, शाम चंचलानी, मनोहरलाल आहुजा, अनिल वाधवानी.
सोसायटीचे अध्यक्ष बाबुलाल सोनी, सचिव शाम दरगड व सदस्यांची पुढाकार घेऊन एकवर्षापासून ही हायटेक यंत्रणा सुरू केली आहे. यासाठी सुमारे दोन ते अडीचलाख रूपये खर्च आलाय.
दुचाकी सापडली
सुगनचंद पंचारिया यांची दुचाकी तीन महिन्यापूर्वी चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला होता. पोलिसांनी त्याआधारे चोराचा शोध अवघ्या काही तासात लावला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत असे श्री. पंचारिया सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.