आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौपदरीचा पार्किंगसाठी वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कोट्यवधी खर्च करून राष्ट्रीय महामार्ग चार पदरी करण्यात येत आहे. र्शी सिद्धेश्वर मार्केट यार्ड समोरील चार पदरी रस्त्यावर दोनही बाजूने मोठय़ा प्रमाणावर मालट्रक थांबतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. चौकात दिवसभर वाहतूक शाखेचे पोलिस उभे असूनही रस्त्याचा वापर पार्किंग प्रमाणे होत आहे.

जनावर बाजार येथे बाजार समितीचे शॉपिंग सेंटर आहे. काही गाळे ट्रान्सपोर्टवाल्यांना दिले असल्याने रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवलेले असतात. मार्केट यार्डासमोरील चार पदरी रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यामुळे वाहतूक सुरळीत होत होती. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने चौकापासून ते शेळगी वळणापर्यंत ट्रक थांबत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताची शक्यता आहे.

नव्या रिक्षा स्टॉपमुळे होतेय गर्दी
मार्केट यार्ड समोरील चौकात जनावर बाजारच्या दिशेने सध्या नवा रिक्षा स्टॉप तयार झाला आहे. येथे दिवसभर दररोज दहा ते पंधरा रिक्षा थांबत आहेत. मार्केट यार्डात कामगारांची आणि ग्राहक संख्या जास्त असल्यामुळे येथील सर्व रिक्षांना प्रवासी मिळतात. यामुळे चौकात वाहतुकीची गर्दी होत आहे.

मागील जागेतही पार्किंग
मार्केट यार्डच्या मागील बाजूस पद्मशाली स्मशानभूमी आणि संस्थेची मोकळी जागा आहे. येथे तमिळनाडूचे ट्रक थांबतात. एका दिवसासाठी प्रति ट्रक 40 रुपये घेतात. यार्डच्या पाठीमागील रस्ता वाहतुकीस मोकळा झाला.

चार पदरी रस्त्याच्या कडेला थांबत असलेले ट्रक हे मार्केट यार्डमधील आणि ट्रान्सपोर्टचे नाहीत. जड वाहतुकीस अट शिथिल केल्यामुळे शहराबाहेर लवकर जाता येईल यासाठी ते ट्रक येथे थांबत आहेत. ट्रान्सपोर्टच्या ट्रकसाठी आम्ही जनावरांच्या बाजारात पार्किंगची सोय केली आहे. धनराज कमलापुरे, सचिव, सिद्धेश्वर कृषि उत्पन्न बाजार समिती