आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद कसा संपवायचा हे हिंदुंना माहीत; साध्वी, पुरोहित लवकरच तुरुंगाबाहेर- हिमानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रामाने रावणाची दहशत संपवली, श्रीकृष्णाने कंसाच्या दहशतीचा नायनाट केला. आम्ही हिंदू आहोत. त्यामुळे दहशतवाद कसा संपवायचा हे आम्हाला माहीत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी व कर्नल पुरोहित यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत त्यामुळे ही मंडळी लवकरच बाहेर पडतील, असे प्रतिपादन अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी व्यक्त केले.
लक्ष्मी सहकारी बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित नववर्ष व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांच्या व्यथा' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
मालेगाव स्फोटप्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित ही मंडळी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचे सांगत सावरकर म्हणाल्या, 'मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी, कर्नल यांना नाहक गोवण्यात आले. साध्वींना कर्करोगाने ग्रासले आहे तर, कर्नल प्रसाद आणि सुधाकर चतुर्वेदी यांची बोटे मोडली आहेत. त्यांची पत्रे मला येत असतात. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यावर जो आरोप लावण्यात आला, त्या साडेचार हजार पानांच्या आरोपपत्रात एकही सबळ पुरावा नाही. त्यामुळे ही मंडळी लवकरच बाहेर पडतील, असेही सावरकर यांनी विश्वास व्यक्त केला. मूळ विषयावर बोलताना त्यांनी वासुदेव बळवंत फडके, चाफेकर, सावरकर, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या कुटुंबीयांबातील किस्से सांगितले.