आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"चलो बौद्ध की ओर' देणार "हिंदू घर वापसी'ला धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संघपरिवाराने सुरू केलेले "हिंदू घर वापसी' हे आमच्यासाठी कारागृह आहे, अशी भूिमका मांडून बौद्ध धम्म चळवळ पश्चिम महाराष्ट्रात "चलो बौद्ध की ओर'चा जोरदार नारा देत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये धर्मांतर केले, त्याच दीक्षाभूमीत (नागपुरात) येत्या आॅक्टोबर २०१६ मध्ये पाच लाख लोकांचे धर्मांतर करण्यासाठी शहरात, खेड्यापाड्यात चळवळीचे कार्यकर्ते काम करीत आहेत.केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच हिंदुत्व चळवळीने "हिंदू घर वापसी'चे नारे िदले. या पार्श्वभूमीवर हिंदू घर वापसी आमच्यासाठी कारागृह आहे, अशी भूमिका मांडत "बौद्ध घर वापसी'चे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे जातीय, सामाजिक पातळीवर मोठे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाचहजार जण सोलापुरातून?
चळवळीतीलकार्यकर्ते हनुमंत उपरे (मुंबई) आणि श्रीधर जाधव (पुणे) यांनी सांगितले की, सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोलापुरातून अनेक जातीतील कुटुंबे "बौद्ध की ओर'साठी तयार आहेत. काही कुटुंबांनी नोंदणी केली आहे. एकूण ३३ जातींमधून महाराष्ट्रातून १६५० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. मराठा, ब्राह्मण, ख्रिश्चन, सोनार, कुंभार, वंजारी, बंजारन, शिंपी, चर्मकार आदींचा समावेश आहे.
चळवळीतलेलोक काय म्हणतात... : मुळातचअसलेल्या नागवंशी (बौद्ध) लोकांनी धर्मांतर केल्याने आज वेगवेगळ्या जाती दिसताहेत, पण भेदाभेद आणि विकासातील अंतरही तेवढेच वाढलेले दिसत असल्याने आता मूळ असलेल्या बौद्ध धर्मात "घर वापसी' करण्याची गरज आहे.
धर्मांतर नव्हे, बौद्ध विचाराला शरण
धम्म आचरण करण्यासाठी आम्ही बौद्ध विचाराला शरण जात आहोत. हे धर्मांतर नाही, गौतम बुद्धांनी जो विचार दिला, त्याचे आचरण करणार आहोत. जे योग्य वाटतेय तेच आम्ही करतोय. राजेशबासूतकर
काहीदिवसांतच हिंदुत्व चळवळीने "हिंदू घर वापसी'चे नारे दिले. या पार्श्वभूमीवर हिंदू घर वापसी आमच्यासाठी कारागृह आहे, अशी भूमिका मांडत "बौद्ध घर वापसी'चे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे जातीय, सामाजिक पातळीवर मोठे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाचहजार जण सोलापुरातून?
चळवळीतीलकार्यकर्ते हनुमंत उपरे (मुंबई) आणि श्रीधर जाधव (पुणे) यांनी सांगितले की, सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोलापुरातून अनेक जातीतील कुटुंबे "बौद्ध की ओर'साठी तयार आहेत. काही कुटुंबांनी नोंदणी केली आहे. एकूण ३३ जातींमधून महाराष्ट्रातून १६५० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. मराठा, ब्राह्मण, ख्रिश्चन, सोनार, कुंभार, वंजारी, बंजारन, शिंपी, चर्मकार अशा अनेक जातींचा त्यात समावेश आहे.
चळवळीतलेलोक काय म्हणतात...
मुळातचअसलेल्या नागवंशी (बौद्ध) लोकांनी धर्मांतर केल्याने आज वेगवेगळ्या जाती दिसताहेत, पण भेदाभेद आणि विकासातील अंतरही तेवढेच वाढलेले दिसत असल्याने आता मूळ असलेल्या बौद्ध धर्मात "घर वापसी' करण्याची गरज आहे.
धर्मांतर नव्हे, बौध्द विचाराला शरण जातोय
धम्मआचरण करण्यासाठी आम्ही बौध्द विचाराला शरण जात आहोत. हे धर्मांतर नाही, गौतम बुद्धांनी जो विचार दिला, त्याचे आचरण करणार आहोत. जे योग्य वाटतेय तेच आम्ही करतोय. राजेश बासूतकर
ओबीसीचे नव्हे तर वेगवेगळ्या जाती, धर्मातील लोक या चळवळीत सहयोग देत आहेत. सोलापूर, पुणे पश्चिम महाराष्ट्रातून छोट्या, मोठ्या धम्म परिषदांमधून जनजागृती केली जात आहे. सोलापूर शहरातून जवळपास पाच हजार जण "चलो बौद्ध की ओर'मध्ये सहभागी होतील. श्रीधरजाधव, (संयोजक,पुणे)
"चलो बौद्ध की ओर' (घर वापसी) साठी जातनिहाय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विविध जाती, धर्मांतील लोक खुशीने या चळवळीत जोडले जात आहेत. सोलापुरातूनही चांगला प्रतिसाद मिळतो अाहे. पाच लाख लोक आमच्या चळवळीत येतील, असे नियोजन आहे. हनुमंतउपरे,( प्रमुखसंयोजक, मुंबई)