आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरम : हिंदू‑मुस्लिम ऐक्याचे दर्शन, डोळ्याचे पारणे फेडणारी दुर्वेश सवारीची मशाल मिरवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा असलेल्या मोहरमच्या राष्ट्रीय उत्सवामध्ये सोलापुरात विविध भागांतील पंजांच्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले. मोहरमच्या पहिल्या दिवशी रविवारी 26 ऑक्टोबर रोजी पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवसांच्या प्रतिष्ठापनेनंतर दहाव्या दिवशी मंगळवारी नोव्हेंबर रोजी पारंपरिक पध्दतीने विसर्जन मिरवणूक काढून मोहरम उत्सवाची सांगता करण्यात आली. पीर मंगळवेढा अहले हरम सवारी, दादापीर पंजा, हुसेन बाशा या पंजांच्या मिरवणुकीत मानकरी हिंदू समाजबांधव होते. तसेच अनेक पंजांच्या मिरवणुकीत मुस्लिमांबरोबरच हिंदू समाजबांधवांची संख्याही लक्षणीय होती.
पीरमंगलवेढा सवारीत नव्वद टक्के हिंदू बांधव
हिंदू-मुस्लिमऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर मंगलवेढा अहले हरम सवारीची मिरवणूक मंगळवारी सकाळी आठ वाजता पारंपरिक वाद्यात मोठ्या थाटात काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू बांधव नव्वद टक्के उपस्थित होते.मिरवणुकीत दरवर्षी कै. शंकर पैलवान यांचे वाघाचे नृत्य आकर्षक असायचे. मात्र, त्यांच्या नातवाने त्यांची कसर नेहमीप्रमाणे भरून काढली. त्या मुलांबरोबर नृत्य करून अनेकांनी आनंद लुटला. या नृत्यावेळी हलगी आणि ताशा या पारंपरिक वाद्य वाजणाऱ्यांमधील चुरस पाहण्यासारखी होती. जो चांगला वाजवेल त्याला लोणार समाजाकडून रोख बक्षीस देण्यात आले. मिरवणुकीच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काळे, काँग्रेसचे अमोल शिंदे, भाजपचे बिज्जू प्रधाने, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, संकेत पिसे, शैलेश पिसे, हाजी अय्युब कुरेशी, सतीश प्रधाने, अमर ढंगेकर, भाईलाल तासगावकर, अ. गफ्फार मुर्शद, मुदस्सर शेख, शरद दीक्षित, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी परिसरातील हिंदू महिला भगिनींनी मोठ्या भक्तीने सवारीचे दर्शन घेतले. इमारतीवर उभारून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच समारोपप्रसंगी खजूर, बदाम, खडीसाखर आदींचा वर्षाव करण्यात आला. तो प्रसाद घेण्यासाठी भक्तांची गर्दी लोटली होती. यानंतर समारोपप्रसंगी उपायुक्त सुभाष बुरसे, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. सवारीचे मुजावर एजाजहुसेन यांनी उपस्थित प्रमुखांचा सत्कार केला.