आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर- ‘आक्रमकांचा सत्य इतिहास झाकून देश आणि संस्कृतीच्या शत्रूंना राष्ट्रपुरुष ठरवण्याचे काम सरकारी प्रोत्साहनाने होत असून मी ‘आवरण’द्वारे सत्य उलगडण्याचे काम केले आहे’, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांनी मंगळवारी केले.
‘आवरण’ कादंबरी लिखाणाबद्दल क्रांतिवीर बडवे ट्रस्टच्या वतीने भैरप्पा यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. भागवताचार्य वा. ना. उत्पात, अभयसिंह कुलकर्णी, विवेक बेणारे, महेश खिस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
भैरप्पा म्हणाले, माझ्या साहित्याचा हेतू मनोरंजनाचा नाही. शालेय पाठ्यपुस्तकातून इतिहास चुकीचा शिकवला जातो. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानपासून टिपू सुलतानपर्यंत सर्वांचा इतिहास दडपण्याचे काम सतत चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मी सत्यच सांगितले
भैरप्पा म्हणाले की, भावी पिढीला काशी,मथुरेस गेल्यावर प्रश्न पडेल की या मंदिराचा विध्वंस कोणी केला. नगरांचे इस्लामीकरण कोणी केले. म्हणूनच मी पुराव्यासह सत्य सांगण्याचे काम केले आहे. इंग्रजांचे राज्य संपले, मात्र त्यांनी जातीजातीत विभागणी करून जी भांडणे लावली, ती परंपरा आपण सुरूच ठेवली आहे. त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
‘आवरण’चा मराठी, गुजरातीमध्ये अनुवाद
माझ्या लेखनाला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘आवरण’च्या कन्नडमध्ये 34 आवृत्त्या निघाल्या तर मराठी, हिंदी, संस्कृत, गुजरातीमध्ये अनुवाद झाला. इंग्रजी अनुवादही सुरू आहे. इतिहास लिहिण्याची एक पद्धत असते. त्यामागे सत्य शोधण्याशिवाय कोणताही हेतू असता कामा नये, असे भैरप्पा यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.