आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

786 क्रमांकाच्या नोटांचा छंद जोपासणारा तरुण अवलीया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मिळेल तेथून 786 क्रमांकाच्या नोटांचा संग्रह करायचा छंद त्याला तीन वर्षांपूर्वी लागला. आतापर्यंत त्याने या क्रमांकाच्या पंधरा हजार रुपये गोळा केले आहेत. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या राहुल शिवलिंगप्पा शहाबादे याने हा छंद जोपासला आहे.

मुस्लिम धर्मात 786 हा क्रमांक ‘लकी नंबर’ मानण्यात येतो. तीन वर्षांपूर्वी राहुलला 786 क्रमांकाची एक नोट मिळाली आणि ती त्याने सांभाळून ठेवली. त्यानंतर त्याला हा छंदच जडला. एक-एक करत त्याने हजार, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा आणि पाच रुपयांच्या नोटा गोळा केल्या. राहुलला त्याचे वडील शिवलिंगप्पा शहाबादे आणि मोठ्या भावाने सहकार्य केले.
खिशात पैसे नसल्याने ‘त्या’ नोटा खर्च करण्याची वेळ अनेकदा आली. मात्र, गरज भागल्याने बर्‍याच वेळा नोटा खर्च कराव्या लागल्या नाहीत. एकदा मात्र 786 क्रमांक असलेले पाच हजार रुपये खर्च झाले. त्याचे त्याला आजही वाईट वाटते.

छंद अखंडपणे जोपासणार
राहुल हा सिद्धेश्वर हायस्कूलचा विद्यार्थी असून महाविद्यालयीन शिक्षण त्याने दयानंद महाविद्यालयात घेतले. सध्या तो गुलबर्गा येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. 786 क्रमांकाच्या नोटा संग्रही ठेवण्याचा हा छंद अखंडपणे जोपासण्याचा संकल्प असल्याचे त्याने सांगितले.