आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात घरपोच मिळेल रेल्वेचे तिकीट, ऑनलाइन बँकिंग नाही, चिंता नको...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ऑनलाइनशॉपिंगच्या या जमान्यात अनेकांना "कॅश ऑन डिलिव्हरी'ची पद्धत भावते. हीच सुविधा रेल्वे तिकिटाच्या बाबतीत लागू झाली आहे. आयआरसीटीसीने देशातील २०० निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये सोलापूरचाही समावेश आहे. सोलापूरकरांना आता घरबसल्या रेल्वेचे तिकीट मिळणार आहे. आयआरसीटीवरूनतिकीट काढण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लागते किंवा ऑनलाइन बँकिंग करावे लागते, मात्र आता त्याचीही गरज लागणार नाही.
अशी मिळेल सुविधा
"आयआरसीटीसी'च्यावेबसाइटवर तिकीट बूक करताना "होम डिलिव्हरी' हे ऑप्शन दिले आहे. हे ऑप्शन निवडताना आपला पत्ता द्यावा लागेल. या पत्त्यावर कुरिअर कंपनीकडून एका दिवसात हे तिकीट मिळेल. यासाठी प्रवाशांना होम िडलिव्हरीचे पैसे द्यावे लागतील. स्लीपर कोचच्या ितकिटासाठी 40 रुपये अतिरिक्त तर एसी डब्याच्या तिकिटासाठी ६० रुपये जादा द्यावे लागतील.
सोलापुरात घरपोच मिळेल रेल्वेचे तिकीट
महत्त्वाच्या शहराप्रमाणे सोलापुरातही ही सुविधा सुरू झाली आहे. प्रवाशांनी हातात तिकीट पडल्यानंतरच पैसे द्यायचे आहेत. रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रयोग आहे.'' संदीपदत्त, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, नवी दिल्ली.