आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या स्वप्नपूर्तीकरिता चौकस झाले सोलापूरकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- असावे घरकुल आपुले छान.. असे स्वप्न घेऊन स्थापत्य प्रदर्शन पाहायला गेलेल्या सोलापूरकरांची संख्या पहिल्याच दिवशी रात्री साडेनऊपर्यंत 11 हजारांवर गेली. होम मैदानावर स्थापत्य 2013 प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. बांधकाम विषयक 87 स्टॉल्समधून नवीन प्रकल्पांची माहिती, शहर व परिसरातील नवीन गृहनिर्माण प्रकल्प, वास्तुशास्त्र, घरातील अंतर्गत सजावट, पर्यावरण पूरक बांधकामांचे स्क्रीनवर दाखविण्यात येणारे माहितीपट ग्राहकांना आकर्षिक करीत असल्याचे, संयोजन समितीचे अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले.

इंटेरियर सोल्युशन्स पाहण्यास गर्दी
नॅचरल कंपनीतर्फे वॉलपेपर, वॉलपोस्टर्स, लाकडी प्लोरींग्ज, ग्लास फिल्म, विंडो ब्लाइंडस आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रदर्शनस्थळी ठेवण्यात आलेले वॉलपेपरचे अल्बम पाहण्यासाठी गर्दी होत आहे. भिंतीवर तो वॉलपेपर लावल्यानंतर कसा दिसेल, किती खर्च येईल, कोणता रंग उठून दिसेल यासह ग्राहकांच्या मनातील प्रश्नांची माहिती स्टॉलधारक ग्राहकांना समजावून सांगत असल्याचे चित्र दिसत होते.
अल्ट्राटेकचा माहितीपूर्ण स्टॉल
अल्ट्राटेक कंपनीने बांधकामासाठी लागणारी वाळू, सिमेंट, विटा, खडी, स्टील यासह चांगले बांधकाम साहित्य व खराब साहित्य कसे ओळखावे यासाठी योग्य व अयोग्य साहित्य प्रदर्शनस्थळी ठेवले आहे. तसेच, त्याबाबतची शास्त्रीय माहिती स्वतंत्र फलकांवर दिली असल्याने नवोदितांना त्याबाबत परिपूर्ण माहिती मिळते. तसेच, ग्राहकांना सिमेंटचे ग्रेड व त्याचे वैशिष्ट्य सांगण्यात येते.
गृहनिर्माण प्रकल्पांना गर्दी
शहर व परिसरात नव्याने सुरू असलेले 2 बीएचके, 3 बीचके अपार्टमेंट, रो हाऊस, ओपन प्लॉटच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या स्टॉलना ग्राहकांची मोठी गर्दी आहे. आपटेंच्या इंद्रधनु गृहप्रकल्पाच्या माहितीसाठी भव्य स्टॉल उभारण्यात आला आहे. वैष्णवी गृहनिर्माण, धोरीया टाउनशिप, गुलमोहोर यासह अनेक गृहप्रकल्पांची सोलापूरकर चौकसपणे माहिती घेत असल्याचे दिसून आले.

बांधकामाची ट्रिक कळाली
शहरात आलेले व येत असलेल्या नवनवीन गृहप्रकल्पांची माहिती मिळण्याबरोबरच बांधकाम साहित्यांची पडताळणी कशी करावी यासह पर्यावरण पूरक व आपल्या गरजेनुसार बांधकाम कसे करावे, याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली.’’ दीपक झिंझुर्डे, सोलापूर
4होम मैदानावर सुरू असलेल्या स्थापत्य प्रदर्शनात जलजागरण आणि पर्यावरणपूरक बांधकाम या दोन बाबींना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. सौरऊर्जा प्रकल्प, बायोगॅस, जलपुनर्भरणाचे मॉडेल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या शहरवासीयांना धुळीचा त्रास होऊ नये याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे.’’ अजय पाटील, अध्यक्ष, संयोजन समिती

किचन ट्रॉली, झुला, इंटेरियर स्टॉल्स फुल्ल
आपल्या गरजेनुसार आवश्यक किचन ट्रॉली मिळेल का? स्टेनलेस स्ट्रील फ्रेमिंग, बास्केटस, मेंब्रन, अँक्रॅलिक यासह रंगसंगती याबाबतची माहिती घेण्यासाठी महिलांची विशेष गर्दी आहे. तसेच, मार्बल आर्टिकल व नॅचरल स्टोनच्या लक्ष्मण स्टॉल्समधील इंटेरिअर पेंटिंग, आर्टिकल फ्रेम्स, वॉल हॅगिंग, वॉल पोस्टर, मार्बल आर्टिकल्स, आर्टिकल फ्रेम्स, आकर्षक मार्बल मंदिर व तुलसी वृंदावन स्टॉलमध्ये असून त्यास ग्राहकांची गर्दी आहे. स्टिलची आरामखुर्ची, झुला, बाल्कनी पॅराफिट स्टॉल्सना ग्राहकांची गर्दी आहे.