आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मैदानाचा होतोय उकिरडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वर्षातील साडेदहा महिने महापालिकेच्या ताब्यात असणार्‍या होम मैदानाला उकिरड्याचे रूप आले आहे. डंपरच्या सहाय्याने तेथे विनापरवाना मुरूम आणि शहरातील बांधकामाचा आजोरा टाकण्यात येत आहे, पण हा मुरूम कोणाकडून टाकण्यात येत आहे, याविषयी प्रशासन अनभिज्ञ आहे. महापालिकेचे नगर अभियंता, सफाई अधीक्षक, झोन अधिकारी आमची जबाबदारी नाही, असे म्हणून टाळाटाळ करत आहेत.

मागील दोन दिवसांत मैदानावर 100 डंपर मुरूम टाकण्यात आले आहे. ग्रामदैवत र्शी सिद्धेश्वर यात्रेच्या (गड्डा) वेळी हा मुरूम उचलावा लागणार आहे. त्यावेळी लाखो रुपयांची बिले समिक्षा कन्ट्रक्शन कंपनीस द्यावी लागणार आहेत. आताच खबरदारी घेतली गेली तर मातीत जाणारे मनपाचे पैसे वाचतील. रात्रीच्या वेळीच मुरूम आणि आजोरा टाकण्यात येत आहे.

सुमारे 15 लाखांचा आर्थिक भुर्दंड बसणार पालिकेला
मैदानावर टाकला जाणारा मुरूम गड्डा यात्रेच्या काळात उचलावा लागेल. समिक्षा कन्ट्रक्शन कंपनी प्रतिटन 650 रुपयांप्रमाणे एका डंपरला साडेसहा हजार रुपये घेते. त्यामुळे भविष्यकाळात हा मुरूम उचलण्यासाठी महापालिकेस 15 लाखांचा भुर्दंड पडणार आहे.

घाण सिद्धेश्वर तलावात येते
होम मैदानावर आजोरा आणि मुरूम टाकला जातो. मैदान महापालिकेच्या ताब्यात असल्याने आम्हाला काही करता येत नाही. पावसाळ्यात तेथील घाण सिद्धेश्वर तलावात येत असल्याने तलाव प्रदूषित होत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला. मैदान आमच्या ताब्यात द्या, त्याची देखभाल आम्ही व्यवस्थित करू. गुंडप्पा कारभारी, विश्वस्त, सिद्धेश्वर देवस्थान कमिटी

आयुक्त वगळता इतरांची टोलवाटोलवी
मैदानावर विनापरवाना मुरूम टाकला जातोय, ते रोखण्याची जबाबदारी आमची नाही असे उत्तर अधिकार्‍यांकडून मिळत आहे. झोन अधिकारी एस. डी. मायनळ्ळीकर म्हणाले, आम्ही मेंटेनन्सची कामे करतो. सफाई अधीक्षक आर. एम. तलवार म्हणाले, आजोरा काढण्याचे काम नगर अभियंता कार्यालयाकडून केले जाते. आम्ही कचरा उचलतो. नगर अभियंता सावस्कर यांना विचारले असता त्यांनी हे माझे काम नाही झोन आणि आरोग्य निरीक्षकांचे काम आहे.