आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोलापुरात घेऊन आलेले विमान चुकीच्या पद्धतीने उतरवल्यामुळे वैमानिकाला शहराला पाच घिरट्या घालण्याची शिक्षा मिळाली. अचानक ब्रेक दाबल्याने दोन्ही नेत्यांना धक्का बसला. विमानातून उतरल्यानंतर गृहमंत्री शिंदे यांनी वैमानिकाची कानउघाडणी करून त्याला विमान धावपट्टीवर उतरण्याचा सराव करण्याचा आदेश दिला. अचानक ब्रेक दाबणे वैमानिकाच्या अंगलट आले. शनिवारी सकाळी सोलापूर येथील होटगी रस्तालगतच्या विमान धावपट्टीवर प्रसंग घडला.
सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हे तुळजापूरला जाण्यासाठी खास विमानाने दिल्लीहून सोलापूरला आले. सव्वाअकरा वाजता हे विमान उतरत असताना त्याचा वेग ताशी दोनशेपेक्षा अधिक होता. धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याचा वेग कमी होण्यासाठी कारखान्याच्या दिशेने जाणे आवश्यक होते. पण वैमानिकाने तसे न करता थेट विमानाला ब्रेक लावून ते मुख्य स्थानकाकडे वळवले. धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. शिंदे यांनी त्या वैमानिकाला शहराला पाच घिरट्या मारून लँडिंगचा सराव करण्याची शिक्षा दिली.
धावपट्टीच्या तुलनेत विमानाचा वेग अधिक
सोलापूर विमानतळाची धावपट्टी 2100 मीटरची आहे. विमान उतरवताना त्याचा वेग हा ताशी 200 व त्याहून अधिक असतो. विमान योग्य पध्दतीने थांबवण्यासाठी कारखान्याच्या दिशेने असणाºया धावपट्टीच्या कोपºयापर्यंत विमान नेऊन तेथून वळवतात. त्यानंतर विमान मुख्य पोर्चमध्ये आणले जाते. तोपर्यंत विमानाचा वेग बºयापैकी कमी होतो. परिणामी विमानातील प्रवाशांनाही त्याचा त्रास होत नाही. वैमानिकाने विमानाचा वेग कमी करण्यासाठी पुढे न जाता थेट बे्रक लावून विमान मुख्य स्थानकाच्या दिशेने वळवले. शिवाय विमानाचा वेग अधिक असल्यामुळे त्याचे पंखे जोरात फिरत होते. त्यामुळे मोठी धूळ उडाली.
लँडिंग करण्याची ही आहे आदर्श पद्धत
विमान उतरवत असताना धावपट्टीचे ओरिएनटेशन पाहणे महत्त्वाचे आहे. विमानाची धावपट्टी सुरू होते त्याला प्रशासकीय भाषेत 1/5 असे म्हणतात आणि धावपट्टीची शेवटची बाजू जी साखर कारखान्याच्या दिशेने आहे त्याला 3/3 असे म्हणतात. 3/3 च्या दिशेला कारखान्याची चिमणी असल्यामुळे विमानाचे हवेत झेपावणे व उतरवणे 1/5 च्या बाजूने होते. विमान उतरवत असताना कारखान्याच्या दिशेने असलेल्या धावपट्टीच्या शेवटी जाणे गरजेचे आहे. तेथून विमान फिरवून मुख्य स्थानकापर्यंत येणे हीच विमान उतरवण्याची आदर्श पद्धत आहे.’’ - संतोष कौलगी, विमानतळ व्यवस्थापक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.