आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री शिंदे यांच्याकडून लोकसभेसाठी आढावा; पुढील दोन महिन्यांचे केले नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघातून कोण लढणार हे काँग्रेसमध्ये अधिकृतपणे निश्चित नसले तरी दोन दिवसांच्या सोलापूर दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदार संघाचा पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून पक्षाचे काम पोहोचवले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या.

शनिवारी आणि रविवारी ते काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना टप्प्याटप्प्याने भेटले. शनिवारी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी, तसेच तालुकाध्यांशी त्यांनी चर्चा केली. यातून सध्याची पक्षाची स्थिती, पक्षाच्या सर्व कमिट्या स्थापन झाल्या आहेत की नाही, पक्षाने कार्यक्रम काय ठरविले आहेत याचा आढावा घेतला. पक्षाच्या सर्व कमिट्या स्थापन करा, गावभेटींचे दौरे ठरवा, पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके , माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबरोबर त्यांनी या विषयांवर चर्चा केली.

निवडणूक लढण्याची चर्चा

श्री. शिंदे यांनी आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका यापूर्वी काही वेळा बोलून दाखविली आहे. पण अलीकडच्या काळात ते या विषयावर जाहीरपणे काहीच बोलत नसल्याने ते यावेळची लोकसभा निवडणूक लढवतील असा कयास राजकीय वर्तूळातून व्यक्त होत आहे. शिवाय, शनिवार व रविवारी या दोन दिवसांत फक्त दोनच सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी स्वीकारले. त्या पार्श्वभूमीवर या दौर्‍यातील राजकीय आढावा घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काँग्रेस पक्षात सक्रियता वाढली आहे.

नगरसेवक प्रकरणी अस्वस्थता

सोलापूर महापालिकेतील आठ नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने शहर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. महापालिकेच्या सत्तेवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोमवारी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या निकालाकडे लक्ष ठेवले आहे. सोमवारी नगरसेवकपद रद्द होण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे. त्यासंदर्भातही नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेतली.