आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या करणारी टोळी झाली जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पोलिसांनी सोमवारी नऊ युवकांना अटक केली. त्यांच्याकडून आठ लॅपटॉप, दोन एलसीडी टीव्ही व सोन्याचे सात तोळे दागिने असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा चोरीचा माल असून ते पुणे येथे विक्रीस नेते होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. विशेष म्हणजे पकडलेले आठ तरुण विशीच्या आसपासचे आहेत, तर एक तिशीतला आहे.

जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची पाच तोळे लगड, पाच झुबे, दोन कर्णफुले, दोन नथ, दहा मोबाइल संचासह रोख रक्कम 5 हजार 800 चा समावेश आहे. ते प्रवास करत असलेली झायलो मोटारकारही (एमएच 12, एफझेड 837) ताब्यात घेतली आहे. ही गाडी गुन्ह्यांसाठी वापरलेली आहे. र्शी. प्रधान म्हणाले की, सोलापूरसह परजिल्ह्यातही घरफोड्या करून मुद्देमाल पुण्यास विक्रीला नेत होते. दुपारी पावणेतीनच्या सुमारास तुळजापूर रस्त्यावरील हॉटेल शीतलजवळ त्यांना ताब्यात घेतले. गाडीच्या तपासणीत मुद्देमाल हाती लागला. प्राथमिक चौकशीत हा माल चोरीचा असल्याचे त्यांनी कबूल केले.

कुडरुवाडी येथे 24 ऑगस्ट रोजी रामचंद्र पांडुरंग मिरगणे यांचे घर फोडून चार लाख 88 हजार रुपये व सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केले होते. नांदेड येथून 31 जुलै व 8 ऑगस्टला दोन घरफोडी, 13 ऑगस्टला सोलापुरात विजापूर नाका परिसरातील पंधे कॉम्प्लेक्स्, होटगी रस्ता, जोडभावी पेठ, भवानी पेठ आदी ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती चोरांनी दिली. मिरगणे यांच्या चोरीच्या तपासकामादरम्यान खबर्‍यामार्फत या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे र्शी. प्रधान यांनी सांगितले. ही कारवाई र्शी. प्रधान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय अधिकारी अनिल पाटील, पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक संजीव झाडे, शीतल घोगरे, शरद शिंदे, अशोक देशमुख, हवालदार अल्ताफ काझी, संजय भंडारे, सुनील साळुंखे, अजय वरपे, फयाज बागवान, मोहन मन्सावाले, चालक इस्माईल शेख, केशव पवार यांनी केली.

संशयित युवक लातूर आणि पुण्यातले
राहुल विष्णुकांत चंद्रपाटले (वय 21), सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले (19), इश्राद आलम शेख (20), नितीन विभीषण जगनावे (19, सर्व रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर), नितीन राम मुरकुटे (19, रा. लासुर्णा, ता. देवणी, जि. लातूर), संतोष उद्धव मुरकुटे (18), गोविंद उद्धव मुरकुटे (दोघे रा. रायेवाडी, जि. लातूर), राहुल तुकाराम मोडक (32, रा. वोडकी, हडपसर, पुणे), प्रदीप र्शीमंत मेकले (वय 23, रा. हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.