आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्तार अधिकार्‍याच्या घरातून पाच तोळे दागिने चोरीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उमरगा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रत्नदीप रघुनाथ गायकवाड (रा. वेणुगोपाळ नगर, कुमठा नाका, सोलापूर) यांच्या घरात चोरी झाली. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे.

अडीच तोळे सोन्याचे गंठण, अर्धा तोळे प्रत्येकी दोन अंगठय़ा, आठ ग्रॅमचे कर्णफुले, एक ग्रॅमचा बदाम, चांदीचे कडे, अकरा हजार रुपये असा एकूण ऐवज चोरीस गेला आहे. र्शी. गायकवाड हे शेजारील खोलीत झोपले होते. त्यांच्या घरातील अन्य सदस्य परगावी लग्नासाठी गेले होते. मुख्य दरवाजा बनावट चावीने उघडून चोरटा आत आला. कपाटेही बनावट चावीने उघडण्यात आली. कपाटातील दागिने चोरीस गेले आहेत. सकाळी घरी आल्यानंतर कडीकोयंडा काढल्याचे दिसले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर श्वानपथक आले. काही अंतरावर जाऊन घुटमळले. फिंगर प्रिंट घेतले आहेत. संशयितांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. फिंगर प्रिंटवरून रेकॉर्डवरील संशयितांची माहिती जुळवण्यात येत असल्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळ यांनी सांगितले.

66 हजारांचे मुद्रांक शुल्क चुकवले; तिघांवर गुन्हा
जमीन खरेदीमध्ये 66 हजार 680 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी तिघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 2 सप्टेंबर 2009 रोजी घडली असून, 13 नोव्हेंबर 2013 रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. मुद्रांक जिल्हा अधिकारी साहाय्यक दुय्यम वर्ग दोन यांनी फिर्याद दिली आहे.

अलका आनंद टकले, आनंद कृष्णात टकले (रा. दोघे सी 41, सिद्धेश्वरनगर, विजापूर रोड), रत्नकला अशोक कटकम (रा. टेलीकॉम वसाहत, सात रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तिघांनी मिळून दस्त क्रमांक 7849-11, 7850-11 यात खोटे निवेदन केले आहे. जुना सव्र्हे नंबर 359-6-4 व नवीन सव्र्हे नंबर 20-6-4- प्लॉट नंबर 41 व 42 जागेवर दोन मजली बांधकाम आहे. तिघांनी मिळून दोन्ही प्लॉटची जागा खुली असून त्यावर बांधकाम नाही असे नमूद केले आहे. त्यावर बांधकाम असताना मुद्रांक चुकवण्यासाठी खोटी माहिती निबंधक कार्यालयात नोंदल्यामुळे शासनाची फसवणूक केली म्हणून फिर्याद देण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येण्यात येईल, असे फौजदार बी. जी. कोळेकर यांनी सांगितले.

एक तरुण तडिपार
जोडभावी, फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोर्‍या करणार्‍या संतोष संजय कांबळे (वय 23, रा. जय मल्हार चौक, सोलापूर) याला दोन वर्षांसाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी जोडभावी पोलिसांनी उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या आदेशान्वये केली आहे. कांबळे याला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.