आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homiopathy Doctor Demanding Alopathi Teratmrent In Emergency

अत्यावश्यक वेळी अँलोपॅथी उपचाराची परवानगी मिळावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अत्यावश्यक वेळी अँलोपॅथी उपचार करण्याची परवानगी होमिओपॅथी डॉक्टरांना द्यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 10 जुलै रोजी बंद पुकारण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील वरळे यांनी या वेळी दिली.
आय.एम.ए हॉलमध्ये आयोजित या बैठकीला होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रo्नांवर चर्चा करण्यात आली. होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न आजतागायत सुटले नाहीत. जोपर्यंत सर्व होमिओपॅथी एक होत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणारच नाही. शासकीय सेवेत 25 टक्के जागा होमिओपॅथी डॉक्टरांना देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत करण्यात आली नाही. होमिओपॅथी डॉक्टरांना दुय्यम स्थान दिले जात आहे. शासनाला आपले महत्त्व पटवून द्यायचे असेल तर एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर डॉ. नरेंद्र मदने, डॉ. संजय पडसाळकर, डॉ. एच. एस. अग्रवाल, डॉ. अमित भोसले, डॉ. आर. जक्कापुरे, डॉ. मनीषा आंधळगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बंदमध्ये सहभागी व्हा - होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत संघटनेतर्फे वारंवार निवेदन, आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. परंतु शासनाने नेहमीच या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. संघटनेच्या वतीने येत्या 10 जुलै रोजी पुन्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शहर-जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी मोठय़ा संख्येन उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन डॉ. वरळे यांनी या वेळी केले.