आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hospital News In Marathi, Hospital Not Work Well Issue At Solapur, Divya Marathi

आरोग्य केंद्रे असून अडचण नसून खोळंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्राथमिक आरोग्य कें द्र म्हणजे खेडोपाडीच्या रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा मुख्य स्रोत असते. परंतु मनुष्यबळाचा अभाव, आरोग्यसेवेची दयनीय अवस्था या कारणांनी सद्यस्थितीत असलेल्या आरोग्य केंद्रांचे व्यवस्थापन कोलमडले आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होतात, हे नेहमीचेच चित्र आहे. असे असताना जुन्या आरोग्य केंद्रांची सुधारणा करण्यापेक्षा शासनाला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपक्रेंदे चालू करण्याची भारी हौस आहे. त्यामुळे सोलापुरात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचे दिसून येते.

सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत. या सर्व तालुकास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांतून तत्पर आरोग्यसेवा मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा मार्ग धरावा लागत आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. ही पदे भरली जात नसल्याने आरोग्यसेवेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राऐवजी खासगी दवाखान्यांकडे रुग्ण वळत आहेत.

आहेत त्या सेवेत सुधारणा
सध्या सोलापूर जिल्ह्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 431 उपकेंद्रे आहेत. लोकसंख्येनुसार ही केंद्रे अपुरी आहेत. या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि मदतनीस यांची कमतरता आहे. केंद्रात असलेल्या भौतिक सुविधा सेवेत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रथम जुनी आरोग्य केंद्रे सुधारून ती सक्षम बनवण्याची गरज आहे. परंतु या केंद्रांतील सेवेत सुधारणा करण्याऐवजी नवीन आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना मंजुरी देऊन कामाचा ताण वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

टप्प्याटप्प्याने कामे सुरू
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात सक्षम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन आरोग्य केंद्रांमुळे सेवा आणखी मजबूत होणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रियाही सुरू आहे. लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्रांची संख्या अपुरी आहे. जिल्हा परिषदेकडून मिळणार्‍या सेसमधून कामे सुरू आहेत. आरोग्यसेवेची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.’’ डॉ. निशिगंधा माळी, अध्यक्ष, जिल्हा परिषद