आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेच्या बैठकीत पाणी पेटले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील विस्कळित पाणी प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. लोकांचा विश्वासघात करू नका, अशा भाषेत सुनावले. विरोधी पक्षाने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्तांना दिला. एकूणच महापालिका कार्यालयात पाणी पेटल्याचे वातावरण होते.


विश्वासघात करू नका : नागरिक फोन करून पाण्यासाठी नगरसेवकांना जाब विचारत आहेत. यूआयडीएसएसएमटी योजनेसाठी निधी मिळवून दिला, त्याचे काम पूर्ण केले नाही. होनमुर्गी फाटा ते वडकबाळ पुलापर्यंतचे 1.6 किमी दुहेरी पाइपलाइनचे काम तीन वर्षापासून पूर्ण नाही. पाण्याचा कारभार रामभरोसे चालू आहे, असे खडे बोल सुनावत आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील पाण्याच्या विस्कळितपणाबद्दल जोरदार शेरेबाजी केली. यावेळी महापौर अलका राठोड, पालिका आयुक्त अजय सावरीकर, नगरसेवक आरिफ शेख, देवेंद्र भंडारे, राजकुमार हंचाटे, अश्विनी जाधव, संजीवनी कुलकर्णी, मेघनाथ येमूल आदी उपस्थित होते.


20 टक्के भागात पाणीपुरवठा विस्कळित : शहरात 20 टक्के भागात पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने त्यामुळे इतर भागातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


महापालिका प्रशासनाकडून शहरातील पाणी वाटपाचे नियोजन
पहिला दिवस : अवंती नगर, मुरारजी पेठ, उत्तर आणि दक्षिण कसबा, मरिआई चौक, लक्ष्मी विष्णू चाळ, दमाणी नगर, गवळीवस्ती, लक्ष्मी पेठ, विजापूर वेस, अक्कलकोट रोड, राजीव नगर, किसान नगर, संगमेश्वर नगर, शेळगी, सात रस्ता, जगदंबा चौक, मौलाली चौक, गांधीनगर, भारत सोसायटी, शिक्षक सोसायटी, पांडुरंग वस्ती, तक्षशील नगर, कुर्बान हुसेन झोपडपट्टी, गुमास्ता सोसायटी, भगतसिंग मार्केट, रंगभवन, जुळे सोलापूर, सिंधू विहार, साखर कारखाना रोडची दोन्ही बाजू, विजापूर रोडवरील 22 सोसायट्या, पाटील नगर, राणा प्रताप नगर, प्रताप नगर, एसआरपी कॅम्प.
दुसरा दिवस : बाळे, केगाव, सलगरवस्ती, सेटलमेंट, लिमयेवाडी, रामवाडी, इंदिरा नगर, रेल्वे लाइन परिसर, कल्पना नगर, कोंडा नगर, वज्रेश्वर नगर, व्यंकटेश नगर, मित्रनगर, दहिटणे गाव, आदर्श नगर, जुना कुमठा नाका, मार्कंडेय नगर, हुच्चेश्वर मठ परिसर, नई जिंदगी, किनारा हॉटेल परिसर, कुमठे गावठाण, गोदूताई विडी घरकुल.
तिसरा दिवस : राजस्वनगर, माशाळवस्ती, आंबेडकरनगर चौक, डीएसपी टाकी परिसर, दत्तनगर, भद्रावती पेठ, रविवार पेठ, गवई पेठ, जोशी गल्ली, मार्केट यार्ड, 256 गाळा, गांधी नगर ते गोंधळीवस्ती पर्यंतचा परिसर, विडी घरकुल, जुना कुमठा नाका, जीवक चौक, ताई चौक, हद्दवाढ भाग, आदर्शनगर, बनशंकरीनगर ते सुनीलनगर, आशानगर, एमआयडीसी, नीलमनगर, विनायकनगर, माळीनगर, समरानगर, सुंदरमनगर, अमृतनगर, नेहरूनगर, अशोकनगर, सुनीलनगर, द्वारकानगर, पापारामनगर.
चौथा दिवस : कस्तुरबा टाकी परिसर, मल्लिकार्जुननगर, यशराजनगर, बापूजीनगर, अशोक चौक, संत तुकाराम चौक, भारत रत्न इंदिरा नगर, कुमठा नाका, हुडको, शास्त्रीनगर, पद्मनगर, कुंभारवस्ती, अण्णा कॉलनी, वैष्णवीनगर, विश्वेश्वरय्यानगर.