आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनमोल’ कलाकृतींना सोलापूरकरांची दाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काम हॉटेलमधील वेटरचे. मात्र, प्रतिभेच्या कुंचल्यातून त्याने आपले भावविश्व साकारले. निसर्ग चित्रांपासून ते सामाजिक विषयांवर भाष्य करणारी विविध चित्रे काढून सर्वाना अचंबित करणार्‍या अनमोल गणेर या चित्रकाराने काढलेल्या अनमोल कलाकृती पाहून रसिक दंग झाले.

अनमोल हा सोलापुरातील एका हॉटेलात वेटरचा काम करतो.हॉटेलात काम करत-करत आपल्याला मिळणार्‍या टिपमधून त्याने हे प्रदर्शन भरवले आहे. रविवारी सायंकाळी डॉ. फडकुले सभागृहात आयोजित या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात सुमारे 46 पेंन्टिग ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे महेश गादेकर, झुबेर वळसंगकर, आसिफ पैठण, दिलीप गणेर, माया गणेर, सचिन खरात आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

गुणवंतांच्या पाठीशी राहा
या वेळी आमदार शिंदे म्हणाल्या, प्रयत्नातून मिळालेले यश हे डोक्यात जात नाही. गुणवंत कलाकारांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे. त्यांच्या कलेचे कौतुक करायला हवे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.अशा प्रयत्नातून मोठे कलावंत घडतात.