आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात घरफोडी, 16 तोळे सोने लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या निवृत्त बँक अधिकार्‍याच्या घरातून चोरट्यांनी 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्याशिवाय अर्धा किलो चांदी, सहा हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला. माधव भगवंतराव खिस्ती (जानश्री अपार्टमेंट, दुसरा मजला सी दोन, दक्षिण कसबा) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घरापासून कसबा पोलिस चौकी अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

श्री. खिस्ती हे परिवारासह रविवारी शिर्डी येथे साईदश्रनासाठी गेले होते. मंगळवारी पहाटे घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे आढळून आले. मुख्य दरवाजा कटावणीने तोडून बेडरूमधील कपाट उघडण्यात आले होते. कपाटाची चावी घरातच होती. मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, अंगठय़ा तसेच चांदीची भांडी, अत्तरदाणी, गुलाबदाणी, समया, करंडे, सहा हजार रुपये चोरीस गेले. चोरांनी अपार्टमेंटमधील घरांना बाहेरून कडी लावली होती. खिस्ती पहाटे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फौजदार चावडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथक आले. श्वानपथकही मागविले पण, पावसामुळे ते माग काढू शकले नाही. फिंगर प्रिंट घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेऊ, असे फौजदार एस. के. खटाणे यांनी सांगितले.