आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीत नाव शोधा एका िक्लकवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी आहे प्रक्रिया...
गुगलवरwww.eci.nic.in टाइप करा. यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची वेबसाइट ओपन होईल. यावर National electrol search हे ऑपशन येईल. यावर क्लिक केल्यानंतर मतदाराचे नाव, आडनाव, वय वडिलांचे नाव टाइप केल्यानंतर काही सेकंदामध्येच तुमचे नाव सिसेल. जर यादीमध्ये तुमचे नाव दिसत नसेल तर शेजारी असलेल्या ठिकाणीच मतदार संघाचे नाव टाइप करून नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोलापूर मतदारयादीत नाव शोधण्यासाठी लागणारा वेळ दूर करत निवडणूक आयोगाने विशेष लिंक तयार केली आहे, या लिंकवर नाव टाइप केल्यानंतर काही सेकंदात तुमचे नाव दिसेल. यामुळे आता क्ल्किवर मतदारांना मतदार यादीत नाव दिसणे सोपे जाईल.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी अॅन्ड्राॅइड मोबाइलवरही अॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्होटर इन्फॉर्मेशन सर्च यूजंग इंटरनेट या नावाने खास अॅप्स देण्यात आले आहे. ते डाऊनलोड करूनही तुम्हाला नाव शोधता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान नाेंदणी सुरूच आहे. यािठकाणी मतदार यादीमध्ये नव्याने नाव समावेश करणे, नावामध्ये दुरुस्ती, पत्ता बदल आदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.
नाव शोधण्यासाठी www.eci.nic.in नवी लिंक www.eci.nic.in