आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Interest Story In Marathi, Mongoose Drink Tea, Divya Marathi

चहा पिणारे मुंगूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची चहावाला म्हणून हेटाळणी करण्यात आली. मोदी यांनी या हेटाळणीचा खुबीने वापर केला. त्यांनी देशभर ‘चाय पे चर्चा’ अभियान सुरू केले. त्यामुळे देशात चहाच्या विषयावरून नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत आले आहे. सोलापुरात मात्र चहाची तलफ जडलेल्या एका ची चर्चा पुढे आली आहे. होय. सोलापूरच्या एका मुंगसाला चहाची सवय जडली आहे. तो गजबजलेल्या रस्त्यावरून येतो आणि चहा पिऊन जातो.
शिवाजी चौकात पोलिस वॉच टॉवरच्या मागे विजय इंजिनिअररिंग अँन्ड मशिनरी कंपनी नामक सबर्मसिबल पंप, पाइप्स आदी विक्रीसाहित्याचे दुकान आहे. येथे नित्यनेमाने एक मुंगूस केवळ चहा पिण्यासाठी येतो. सकाळचे अकरा, सव्वाअकरा वाजले की हा मुंगूस दुकानात प्रवेश करतो. मालक र्शीकांत सुरा यांच्या अंगाखांद्यावर, टेबलावर आणि संपूर्ण दुकानात खेळतो. सुरा यांच्यासमोर येऊन बसतो. मालकासोबत चहाचा मनसोक्त आस्वाद घेतो. पूर्ण चहा प्यायल्यावरच त्याचे समाधान होते, असे सुरा यांनी सांगितले.