आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundreds Of Fish Death Issue At Solapur, Divya Marathi

संभाजी तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराचे फुफ्फुस अशी ओळख असणार्‍या संभाजी तलावातील असंख्य मोठे मासे मृत्युमुखी पडले. त्यामुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विजापूर रस्त्यावरील या तलावात परिसरातील ड्रेनेजचे पाणी थेट सोडण्यात येते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने जलचर मृत्युमुखी पडतात. यापूर्वीही अनेकदा तलावातील असंख्य मासे मृत्युमुखी पडले होते.

दोन किलोपेक्षाही जास्त वजनाचे ते मासे असून सामाजिक वनीकरण विभागाकडील बाजूला मृत माशांचा खच पडला आहे. तलावाकाठची जलपर्णी, प्लास्टिक कचर्‍यांमध्ये मेलेल्या माशांचे शरीर कुजत असून त्यामधून आळ्या पडत असल्याचे चित्र आहे.

लाखोंचे झाले नुकसान
मोठय़ा वजनाचे शेकडो मासे मेल्यामुळे आमचे लाखोंचे नुकसान झाले. तलावात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढल्याने नेहमी थोडेफार मासे मरतात. पण यावेळची संख्या मोठी आहे. दीड वर्षांपूर्वी प्रदूषणामुळे तलावातील सर्वच मासे मेले होते.’’ नागेश गायकवाड, ठेकेदार

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्‍यामुळे तलावात मोठय़ा लाटा निर्माण झाल्या. त्यामुळे पाण्यात साचेला गाळ, कचरा ढवळला. उन्हाच्या तीव्रतेमुळे कचरा कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्युमुखी पडले. तसेच, तलावामध्ये कपडे व मोटारगाड्या धुण्यात येतात. तेल व रासायिक घटकांच्या तवंगाचा थर माशांच्या कल्ल्यांवर साचल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा.’’ डॉ. राजशेखर हिप्परगी, प्राणिशास्त्र तज्ज्ञ