आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husaband Wife Life Imprisonment For Trying The Murder In Osmanabad

उस्मानाबादमध्‍ये खुनाचा प्रयत्न करणार्‍या पती- पत्नीस सक्तमजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - किरकोळ वादातून घराशेजारी राहणार्‍या एकास मारहाण करून तसेच कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दाम्पत्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी पाच वष्रे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही घटना 7 मार्च 2009 रोजी रुईभर (ता.उस्मानाबाद) येथे घडली होती.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी निवृत्ती उद्धव भोईटे व आरोपी प्रल्हाद दिगंबर भोईटे हे दोघे रुईभर शिवारात शेतात घर करून जवळजवळ राहतात. परंतु या दोघांमध्ये सतत किरकोळ कारणावरून वाद होत असत. 7 मार्च 2009 रोजी सायंकाळी 6.30 वाजता निवृत्ती भोईटे हे घरापुढे जनावरे बांधत असताना प्रल्हाद भोईटे याने त्यांना शिवीगाळ करून वादास प्रारंभ केला. याबाबत निवृत्ती यांनी विचारणा केली असता प्रल्हाद याने तुला खलास करतो, असे म्हणून निवृत्ती यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. यावेळी प्रल्हाद यांच्या पत्नी उषा भोईटे तेथे दाखल झाल्या. त्यानंतर उषा यांनी निवृत्ती यांना पकडले असता प्रल्हाद याने हातातील कोयत्याने निवृत्ती यांच्यावर घाव घालून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन साहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. बी. गायकवाड यांनी तपास केला व रामेश्वर खनाळ यांनी दोषारोपपत्र सादर केले.


या प्रकरणाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. दात्ये यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार समोर आलेला पुरावा व सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. वाय. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी प्रल्हाद भोईटे व त्याची पत्नी उषा भोईटे या दोघांना भादंवी कलम 307 प्रमाणे पाच वष्रे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर दंडापैकी पाच हजार रुपये जखमी निवृत्ती भोईटे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी शासकीय पक्षाच्या वतीने अँड. पी. वाय. जाधव यांनी बाजू मांडली.