आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर जेवण दिल्याने पत्नीचा खून; पतीला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढ- जेवण लवकर करून वाढल्याच्या कारणाने पतीने डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून पत्नीचा खून केला. साेमवारी (दि. २२) पहाटे मुंढेवाडी शिवारात ही घडली. याप्रकरणी पती लक्ष्मण अंकुश जाधव याला पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) पहाटे अटक केली. गुलाब लक्ष्मण जाधव (वय ४०, रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
यातील संशयित मूळचा रोहा (जि. रायगड) येथील आहे. तो पत्नीसह मुंढेवाडी परिसरात काटेरी झुडपे जाळून कोळसा तयार करण्याचे काम करत होता. २१ जून रोजी पत्नीने जेवण वेळेत करून वाढले नसल्याच्या कारणावरून तिच्याशी त्याचे भांडण झाले. याचा राग मनात धरून त्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूस मारून खून केला. कोळसा व्यापारी राहुल राठोड यानी फिर्याद दिली.
बातम्या आणखी आहेत...