आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Released Without Any Objection In The Case Of Tourching Wife

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीचा पेटवून खून केल्याप्रकरणी पतीची निर्दोष मुक्तता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पत्नीचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी सिद्राम भगवान चौगुले (रा. सदर बझार) याची निर्दोष मुक्तता मुख्य जिल्हा न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी केली. सुरेखा सिद्राम चौगुले यांचा मृत्यू झाला होता. 30 जून 2006 रोजी पती-पत्नीमध्ये भांडण सुरू असताना रागाच्या भरात पेटवून दिले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर बझार पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीतर्फे अँड. आर. एच. रिसबूड, अँड. व्ही. पी. शिंदे यांनी काम पाहिले.
पोलिस मारहाण; दोघे निर्दोष
पोलिस शिपाई लवटे यांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याच्या आरोपातून दोघा तरुणांची निदरेष मुक्तता न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी केली. महिंद्र चिंतामण भालेराव, सैफन पटेल (रा. दोघे सोलापूर) यांची निदरेष मुक्तता झाली. 15 जून 2011 रोजी घटना घडली होती. जुना विजापूर नाका येथे वरील दोघे तरुण रस्त्यामध्ये दुचाकी लावून बसले होते. त्यांना तिथून लवटे यांनी हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मारहाणीचा प्रकार घडला होता. आरोपीतर्फे अँड. व्ही. पी. शिंदे, अँड. दीपक भोसले यांनी काम पाहिले.