आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिन फेल झाल्याने हुतात्मा एक्स्प्रेसला वाजले की 12

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे-सोलापुर हुतात्मा एक्स्प्रेसचे गुरुवारी रात्री वडशिंगेजवळ अचानक इंजिन फेल झाले. त्यामुळे दहा वाजता सोलापूर गाठणार्‍या हुतात्मा गाडीला रात्रीचे बारा वाजले. गाडीचे इंजिन हे दरोडा पडणार्‍या संवेदनशील क्षेत्रात बंद पडल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुण्याहून सोलापूरकडे येणार्‍या हुतात्मा एक्स्प्रेसने रात्री 9 वाजता कुर्डुवाडी ओलांडल्यानंतर काही मिनिटांतच वडशिंगेजवळ ती गाडी बंद पडली. अचानक गाडी बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली. गाडी थांबल्याचे कारण समजत नसल्याने काही प्रवाशी भयभीत झाले होते. संवेदशनशील क्षेत्रात इंजिन फेल झाल्याने गाडी उभी करावी लागली. रेल्वे प्रशासनाने व रेल्वे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व बोगींचे दरवाजे, खिडक्या ताबडतोब बंद करायला लावल्या. अचानक खिडक्या बंद कराव्या लागत असल्याने प्रवाशातून चर्चला ऊत आला. इकडे रेल्वे प्रशासनाने कुडरुवाडी येथून पर्यायी इंजिन आणण्याचे प्रयत्न सुरू केले. एरवी 10 वाजता सोलापूरला पोहोचणार्‍या हुतात्माने 11 वाजले तरीही वडशिंगे सोडले नव्हते. अकराच्या सुमारास इंजिन लावण्यात आले. 11 वाजून 15 मिनिटांनी गाडी वडशिंगे येथून निघाली.

नित्याचाच प्रकार
रेल्वेचे इंजिन फेल होणे हा आता सोलापूर रेल्वे विभागात नित्याचाच प्रकार बनत आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी बागलकोट -यशवंतपूर बसवा एक्स्प्रेसचे इंजिन होटगी येथे फेल झाले होते. तेव्हाही गाडी सोलापूरला पोहोचण्यास दोन तासांचा उशिर झाला होता. त्याच्या अगोदर मुंबई - नागरकोईल एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाले होते.

प्रवाशांची गैरसोय
हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूरला परतल्यानंतर अनेक प्रवाशांना आपल्या घरी जाणे मुश्किल बनले होते. ज्याच्याकडे वाहन होते अथवा ज्यांना घेण्यासाठी कोणी नातलग आले असतील अशांची सोय झाली. मात्र, ज्यांना बसने जावे लागत होते, अशांची मात्र चांगलीच गैरसोय झाली. रात्री बारानंतर रिक्षेवाल्यांनी त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळले