आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हुतात्मा’ लेट; रेल्वेची बेदखल; प्रवासी वैतागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर-पुणे-सोलापूर धावणार्‍या हुतात्मा एक्स्प्रेसला दररोज सोलापुरात पोहोचण्यास उशीर होत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. मागील चार दिवसांपासून पुण्याहून निघण्यास या गाडीला पंधरा ते वीस मिनिटे उशीर झाला. त्यामुळे सोलापुरात ही गाडी दररोज वीस ते तीस मिनिटे उशिरा पोहोचत आहे. मध्य रेल्वे झोनमध्ये निर्धारित वेळेत गाड्या सोडण्यात अव्वल क्रमांक घेणार्‍या सोलापूर विभागाने मात्र याची दखलच घेतली नाही. लेट होण्यामागे पुणे विभाग कारणीभूत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येते. परंतु या दोन्ही विभागाच्या समन्वयाअभावी बिचार्‍या प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.
हुतात्मा एक्स्प्रेसला सुपरफास्ट गाडीचा दर्जा आहे. ही गाडी एक मिनीट लेट झाली तरी याचे कारण संबंधित यंत्रणेला रेल्वे प्रशासनाला द्यावे लागते. मात्र, हुतात्माला दररोज उशीर होत असतानाही सोलापूर विभागकडून दखल घेतली जात नाही. दररोज होणार्‍या उशिरामुळे ही गाडी सुपरफास्ट आहे का पॅसेंजर असा प्रश्न पडतो आहे. पुणे विभागाकडून गाडीची आडवणूक केली जात असल्याने गाडीला उशिरा होत असल्याचे सांगण्यात येते.

दररोज सकाळी सोलापुरातून निघणारी हुतात्मा दौंडपर्यंत निर्धारित वेळेत धावते. परंतु दौंडनंतर पुणे विभागाकडून या गाडीला थांबवून दौंड -पुणे पॅसेंजर गाडी सोडली जाते. परिणामी साडेदहा वाजता पुण्यात पोहोचणार्‍या हुतात्माला दररोज पावणेअकरा तर कधी अकरा वाजतात. अशीच परिस्थिती पुण्याहून निघतानाही होते. हुतात्माची पुण्याहून सुटण्याची निर्धारित वेळ सायंकाळी सहा आहे. मागील तीन-चार दिवसांपासून पुण्याहून गाडी निघण्यास उशीर होत आहे. शुक्रवारी ही गाडी पुण्याहून सहा वाजून 35 मिनिटांनी निघाली. सोलापूरला येण्यास 45 मिनिटांचा उशीर झाला.
प्रवाशांना मनस्ताप
सोलापुरात दररोज उशिरा पोहोचत असल्याने प्रवाशांना घरी गाठण्यासाठी सव्वाअकरा ते साडेअकरा वाजत आहे. बर्‍याचदा स्थानकाबाहेर बसेस मिळत नसल्याने प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. रिक्षाचालक प्रवाशांची आडवणूक करत अव्वाच्यासव्वा भाडे घेतात. महिला प्रवाशांना तर याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

हुतात्मा वेळेवर धावावी
सुपर फास्टचा दर्जा असलेली ही गाडी वेळेवर धावावी, ही अपेक्षा आहे. परंतु शुक्रवारी ही गाडी 6 वाजून 15 मिनीटांनी पुणे स्थानकावरील फलाटावर आली आणि 6 वाजून 35 मिनिटांनी निघाली. प्रवाशांना विनाकारण ताटकळत बसावे लागले.
देवदत्त बोरगावकर, प्रवासी.
पुणे विभागाशी चर्चा करणार
४हुतात्मा एक्स्प्रेसच्या वेळेसंदर्भात या पूर्वीही तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात पुणे विभागाशी चर्चा करून गाडी वेळेवर धावेल यासाठी प्रयत्न करू.
नरपत सिंह, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक.

मध्य रेल्वेकडे तक्रार करणार

४हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी वेळेवर सोलापूरला यावी म्हणून यापूर्वी सोलापूर रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. पुणे विभागाने हा प्रकार थांबवावा नाही तर मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांकडे याची तक्रार करू.
संजय पाटील, उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ.