आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हुतात्मा एक्स्प्रेसचे'चे दोन डबे वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसचे दोन आरक्षित डबे पुढील आठवड्यात वाढणार आहेत. मध्य रेल्वेने त्यास मंजुरी दिलेला फॅक्स गुरुवारी सोलापूर रेल्वे विभागाच्या परिचालन विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे उभे राहत पुणे गाठणार्‍या सोलापूरकरांना आता चांगलाच दिलासा मिळणार असून त्यांचा पुणे प्रवास सुखकर होणार आहे. पुण्याला जाण्यासाठी सर्वप्रथम पसंती सोलापूरकरांनी हुतात्मा एक्स्प्रेसला दिली आहे.

गेल्या 12 वर्षांपासून सोलापूरकरांच्या सेवेत असणार्‍या हुतात्मा एक्स्प्रेसचा विस्तार आता 14 डब्यांवरून 16 डबे होणार आहे. दोन डबे एकदम वाढत असल्याने 208 प्रवाशांना आता सहजरीत्या जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेसला असलेली वेटिंग लिस्ट मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. जे दोन डबे वाढवण्यात येणार आहेत. ते द्वितीय र्शेणीचे आरक्षित डबे आहेत. त्यामुळे सोलापूरकरांची सोय होणार आहे.