आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुतात्मा मंदिरचे नूतनीकरण, पण शुभारंभाला मिळेना मुहूर्त !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा सेतू असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू होते. नूतनीकरणास ‘पॉवर ग्रीड’ने आर्थिक मदतीचा हात दिला. रंगमंचचा पडदा, मेकअप रूममधील काही सुविधा वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पण महापालिका प्रशासन रंगमंचाचा मखमली पडदा उघडण्याच्या तयारीस तितकेसे उत्सुक दिसत नाही. परिणामी नाट्य व्यावसायिकांसोबतच कला-रसिकांची मात्र कुचंबणा होते आहे.

नूतनीकरणाच्या कामाची गतीही कमालीची मंदच होती. एप्रिल 2013 ते जून 2014 असा साधारणत: तेरा महिन्यांचा कालावधी उलटला. मक्तेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. सुमारे दोन कोटी रुपये खर्च या कामासाठी केला आहे. एवढा खर्च करूनही सभागृहातील आसन व्यवस्थेसंदर्भात शंकाकुशंका व्यक्त होत आहे. सभागृहाचे फ्लोरिंग नेहमीच उखडते. दुरुस्ती करताना त्याची दखल घेतली असेल तर उत्तमच. महापालिका प्रशासन हुतात्मा स्मृती मंंदिर कलारसिकांसाठी सुरू करण्यासाठी काही पावले उचलत असल्याचे सध्या तरी दिसत नाही.
गुडेवारांच्या बदलीचा फटका
आयुक्त गुडेवार यांची बदली झाली आहे. त्यामुळे प्रशासनही उद्घाटन सोहळ्यास उत्साही मनस्थितीत नाही. त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिरचे उद्घाटन कधी होईल, याबाबत कोणीच नेमकेपणाने काही सांगत नाही.

मग वाट कुणाची पाहता
४नूतनीकरण झालेल्या हुतात्मा सभागृहाचा पडदा केव्हा पाहतो अशी कलावंतांना आस लागली आहे. वर्षापासून काम सुरूच आहे. कलावंतांची कुचंबणा किती दिवस करणार, असा प्रश्न आहे.
सुहास मार्डीकर, कलावंत

आम्ही तयार आहोत

४हुतात्मा सभागृह नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ठरल्याप्रमाणे सर्व कामे झाली आहेत. आता आम्ही केवळ उद्घाटनाच्या दिवसाची वाट पाहात आहोत.
अजित हरिसंगम, पॉवर ग्रीड, सल्लागार
दिग्गज कलावंतांचे स्मरण
महाराष्ट्राच्या नाट्यरंगभूमीला ज्यांनी वेळोवेळी नवजीवन दिले, अशा दिग्गज कलावंतांचे स्मरण म्हणून सभागृहात प्लायवूडचे डेकोरटिव्ह काम करण्यात आले आहे. ज्यावर नामवंत कलावंतांचे फोटो लावण्यात येणार आहेत. हे काम उद्घाटन सोहळ्यावेळी होणार आहे.