आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hutatma Memorial Temple Argument About The Work In Corporation General Meeting

भाजप-सेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मनपा सर्वसाधारण सभेत पुन्हा महापौर विरोधक असा सामना रंगला. हुतात्मा स्मृती मंदिराच्या अत्यावश्यक विषयावर बोलू दिले जात नसल्याचा निषेध करत युतीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
मार्च मे महिन्यातील तहकूब सभा सोमवारी घेण्यात आली. हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्वयंचलित रिमोटवरचे पडदे लावण्याकरता ६.४० लाख रुपये मुव्हर्स अॅन्ड डेकोरेटर्स, पुणे यांना देण्याचा विषय होता. नगरसेवक पाटील यांनी सदरचे काम कसे केले अशी विचारणा केली. तर नगरसेवक नरेंद्र काळे यांनी अत्यावश्यक कामाची व्याख्या सांगा मुद्दा उपस्थित केला. चर्चा लांबल्याने महापौर आबुटे यांनी पुढील विषय घेण्यास सांगितले. यावरून युतीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
- हुतात्माच्या विषयावर समाधानकारक चर्चा झाली होती. तरीही काही नगरसेवक गोंधळ घालत होते. त्यामुळे पुढील विषय घेण्यास सांगितले.
सुशीला आबुटे, महापौर
- महापौरांनी सर्वांना बरोबर असणे अपेक्षित असताना सदस्यांवर बाॅसगिरी करतात. विरोधी सदस्यांची मुस्कटदाबी करून रोखले जाते. त्यामुळे सभात्याग केला.
प्रा. अशोक निंबर्गी, भाजप, नगरसेवक
या विषयांना मिळाली मंजुरी
टिळक चौकात लोकशाहीर कवी राम जोशी सभागृह बांधणे
दमाणी नगर परिसरात दिवाबत्ती सोय करणे
१४ विहिरींचा गाळ काढण्याचे विषय सभागृहात सादर करणे
राज्यस्तर नगरोत्थान योजनेसाठी ३० टक्के मनपा हिस्सा देणे
विरोधक भेटले आयुक्तांना
विरोधकांच्या सभात्यागानंतर सत्ताधाऱ्यांनी १५ मिनिटांत ४९ विषय मांडून मंजूर करण्यात आले. सभागृहात बसपचे तीन नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्ष नसताना नगरसेवक चंदनशिवे यांनी ऐनवेळी अजेंडा हातात घेत उपसूचना तोंडी वाचली आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावली. दरम्यान युतीच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांची भेट घेऊन हुतात्मा स्मृती मंदिरच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी केली.