आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hyderabad Solapur Highway,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांदूळवाडी पूल दुरुस्तीमुळे बंद, वाहतूक मार्गात बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- हैदराबाद- सोलापूर या महामार्गावरील तांदूळवाडी (दक्षिण सोलापूर) येथील पूल बांधकामाचे (ब्रीज) लोखंडी बेअरिंग खराब झाल्याने तो धोकादायक बनला आहे. याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ने महामार्गावरून वाहतूक सुरू असतानाचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने शनिवारी व रविवारी (21 व 22 जून) सकाळी दुपारी 12 ते 4 या वेळेत हा पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यावेळी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
पुणे व विजापूरहून हैदराबादकडे जाणार्‍या जड वाहनांनी महामार्ग क्रमांक 211 सोलापूर- तुळजापूर- नळदुर्ग या मार्गाचा वापर करावा, तर इतर चारचाकी वाहने सोलापूर, बोरामणी, वडजी, काटगाव- इटकळ मार्गे नळदुर्ग या मार्गाचा वापर करतील. हैदराबादहून पुणेकडे जाणार्‍या जड वाहनांनी नळदुर्ग, तुळजापूर व सोलापूर या मार्गाचा तर विजापूरकडे जाणार्‍या वाहनांनी नळदुर्ग, इटकळ, वळसंग व सोलापूर या मार्गाचा वापर करावा. इतर वाहने इटकळ, निलेगाव, अरळी, मुस्ती व सोलापूर या मार्गाचा वापर करतील.
हायड्रोलिक जॅकचा वापर
पुलावरील स्लॅब आणि पिलरमधील लोखंडी बेअरिंग खराब झाल्या आहेत. पुलाचा स्लॅब दोन हायड्रोलिक जॉकने बाजूला काढण्यात येईल. नवीन लोखंडी बेअरिंग टाकून वरील स्लॅब टाकण्यात येईल.