आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"दिव्य मराठी'चे जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, शुक्रवारी वितरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट- अक्कलकोट शहर तालुका पत्रकार प्रतिष्ठान, मातोश्री लक्ष्मी शुगर, गोकुळ शुगर इंडियन मॉडेल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. दै. "दिव्य मराठी'चे बातमीदार संजय जाधव यांच्यासह आठ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
पत्रकारदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. ९) दुपारी एक वाजता येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या सभागृहात आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मॉडेल स्कूलचे उपाध्यक्ष अमोल जोशी हे राहणार आहेत. या वेळी संजय येऊलकर, पंचायत समिती सभापती महेश जानकर, मल्लिकार्जुन पाटील, नगराध्यक्षा अनिता खोबरे, तहसिलदार गुरुलिंग बिराजदार, गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, अन्नछत्र मंडळाचे अमोल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविकांत धनशेट्टी, शंकर हिरतोट आदी उपस्थित होते.

पुरस्काराचे मानकरी
संजयजाधव, अनिल कदम, प्रभू पुजारी, राजेंद्र कानडे, धनंजय मोरे, मी मराठीचे जिल्हा प्रतिनिधी मनीष केत, टी.व्ही चे जिल्हा प्रतिनिधी रोहित पाटील, शरणू गोब्बूर.