आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhansabha Election Security News In Divya Marathi

घटनास्थळी पोलिस पोहोचतील १५ मिनिटांत; सीआयएसएफ, बीएसएफ, एसआरपीची चार पथके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मतदानादिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरला कुठे अनुचित प्रकार घडला तर सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत निमलष्करी दल आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी येईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एखादा अनुचित प्रकार घडल्यास पोलिस प्रशासनाकडून त्वरित प्रतिसाद मिळणार आहे. तशा पद्धतीचे िनयोजन केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांनी दिली. राजस्थान, चंदीगड, छत्तीसगड, कर्नाटक (बंगळुरू) येथून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपी) चार पथक सोलापुरात आहेत. संवेदनशील भागात शस्त्रधारी पोलिस, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस निरीक्षक, फौजदार दर्जाचा अधिकारी बंदोबस्त प्रमुख राहणार आहे.

पोलिस, निमलष्करी दलाचे संचलन
विधानसभा निवडणूक, बकरीदनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी रविवारी सकाळी फौजदार चावडी हद्दीत तर सायंकाळी सदर बझार हद्दीत पोलिसांचा रूटमार्च झाला. मार्केट चौकी, विजापूर वेस, खाटीक मशीद, पंजाब तालीम, पांजरपोळ चौक, काळी मशीद ते पारस इस्टेट, नवीपेठ या मार्गावर पथसंचलन झाले. शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी, एसआरपीएफ तुकडी, सीआयएसएफ तुकडी, गुजरातचे विशेष पथक, वज्र वाहनासह सुमारे तीनशे पोलिसांचा ताफा होता. सदर बझार परिसरातील जगदंबा चौक, बेडरपूल, लोधीगल्ली, बापूजीनगर, दोन नंबर बसस्थानक, मौलाली चौक, सतनाम चौकातून जगदंबा चौकात संचलन झाले.