आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Someone Forcefully Demand Money, Then Give Infomation Police Appeal

जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास माहिती द्या, पोलिसांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जयंती उत्सवाच्या नावाने कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास पोलिसांच्या (१००) नंबरवर माहिती द्या. जो तक्रार नोंदवतो त्याला संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांनी आश्वासन दिले आहे.

जिल्हा ट्रान्सपोर्ट मोटार मालक संघातर्फे सोमवारी श्रीमती सानप यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यास कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष महादेव चाकोते यांनी निवेदनाव्दारे दिली आहे. यशिवाय निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना देण्यात आली. जयंती उत्सवाच्या नावाने दमदाटी करून वर्गणी मागत आहेत. या मुद्द्यावर जिल्हा मोटार मालक संघ, सोलापूर गुडस् ट्रान्सपोर्ट, कोंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट मालकांची सभा संघाचे अध्यक्ष चाकोते, ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष सिद्रामप्पा आलुरे यांच्यासमवेत बैठक झाली. दोनशेहून अधिक सभासद उपस्थित होते. वर्गणीच्या त्रासाबद्दल श्री. मुंडे यांना निवेदन दिले. त्यांनी श्रीमती सानप यांना याप्रकारणात लक्ष घालण्यासाठी सूचना दिल्या. ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कार्यालये आहेत त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देऊ, असे आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद आहे.